बदल्यात मिळाले निम्मेच अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:21 AM2021-09-24T04:21:36+5:302021-09-24T04:21:36+5:30
राज्याच्या महसूल व वन विभागाने २२ सप्टेंबर रोजी नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात पाथरी तहसील ...
राज्याच्या महसूल व वन विभागाने २२ सप्टेंबर रोजी नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात पाथरी तहसील कार्यालयातील रतन काजळे यांची उमरगा येथे, सेलू येथील प्रशांत देवडे यांचे औरंगाबाद येथे, मानवत येथील नरेंद्र उखळकर यांची जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे, गंगाखेड येथील गिरिजाशंकर आवळे यांची पैठण येथे, जिंतूर तहसील मधील तानाजी यादव यांची शिरूर अनंतपाळ येथे, तर जिंतूर तहसील कार्यालयातील सुशांत कांबळे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड या ठिकाणी बदली झाली आहे. एकूण सहा नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात पालम येथे राजेश्वर पवळे, परभणी येथे लक्ष्मीकांत खळीकर आणि पूर्णा येथे नितीशकुमार बोलोलू यांची नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. नायब तहसीलदारांची उर्वरित तीन पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या वाढली आहे.