नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:43+5:302020-12-23T04:14:43+5:30

परभणी : आरोग्य विभागाच्या पोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लस दिली जाणार असल्याची माहिती २१ डिसेंबर रोजी ...

Only registered employees will get the vaccine | नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार लस

नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार लस

Next

परभणी : आरोग्य विभागाच्या पोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लस दिली जाणार असल्याची माहिती २१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली लसीकरणाच्या नियोजनासंदर्भात बैठक पार पडली. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.सय्यद मुजीब यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात लसीकरण सत्र राबविण्यासाठी जागा निश्चित करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्वप्रथम शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. मात्र अनेक कर्मचाऱ्यांनी अद्याप पोर्टलवर नोंदणी केली नाही. नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच लस दिली जाणार आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ऐनवेळी नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार नाही. नोंदणीनंतर कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर मॅसेज पाठविला जाणार असून, त्यानुसार ओळखपत्र तपासूनच लसीकरण करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. पहिल्या टप्प्यात लसीकरण केलेल्या कर्मचाऱ्यांना २८ दिवसानंतर दुसऱ्यांना लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे त्याचेही नियोजन या बैठकीत करण्यात आले. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळ, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.एस.पी. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Only registered employees will get the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.