गुटख्याची खुलेआम विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:31 AM2021-03-13T04:31:16+5:302021-03-13T04:31:16+5:30
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला सोनपेठः शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. प्लास्टिक पिशवी वरील कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने शहरात ...
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
सोनपेठः शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. प्लास्टिक पिशवी वरील कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
सोनपेठ शहरात विश्रामगृहाची प्रतीक्षा
सोनपेठः तालुक्याच्या निर्मितीनंतर तालुक्यात विविध कार्यालयाची स्थापना होण्याची आशा येथील नागरिकांना होती परंतु अद्यापही सोनपेठ येथे शासकीय विश्रामग्रह नसल्याने येथे येणाऱ्या राजकीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांना खाजगी जागेतच बैठका घ्याव्या लागतात. त्यामुळे सोनपेठ शहरात शासकीय विश्रामगृहाची अद्यापही प्रतीक्षा आहे.
शासकीय कार्यालयांना इमारतीची प्रतीक्षा
सोनपेठः शहरात तालुक्याच्या निर्मितीनंतर अनेक शासकीय कार्यालये स्थापन झाली. परंतु यापैकी अद्यापही अनेक कार्यालयांना स्वतःच्या मालकीची इमारत नाही. त्यामुळे भाड्याच्या जागेत ही शासकीय कार्यालय अद्यापही कार्यरत आहेत. त्यामुळे अपुऱ्या जागेतच कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागते.
अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त
सोनपेठ : पाथरी परळी व गंगाखेड या रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून पायी चालतानाही त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातील शिवाजी चौकात अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.