उमेदवारांसमोर १९० चिन्हांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:20+5:302020-12-29T04:15:20+5:30

मानवत : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली असून या ग्रामपंचायतींसाठी ३३९ सदस्यांची निवड करण्यात येणार असून, यासाठी नामनिर्देशनपत्र ...

Option of 190 symbols in front of the candidates | उमेदवारांसमोर १९० चिन्हांचा पर्याय

उमेदवारांसमोर १९० चिन्हांचा पर्याय

Next

मानवत : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली असून या ग्रामपंचायतींसाठी ३३९ सदस्यांची निवड करण्यात येणार असून, यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना ४ जानेवारी रोजी चिन्ह वाटप करण्यात होणार आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांसमोर १९० चिन्हांचा पर्याय दिला आहे. १९० चिन्हांमधून उमेदवाराला एका चिन्हाची निवड करता येणार आहे.

तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. नामांकन भरण्याच्या दिवसापासून निवडणुका असलेल्या गावागावांत राजकीय हालचालींना चांगलीच गती आल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार तहसील कार्यालयात येऊन अधिकारीवर्गाकडून अटी व नियमांची माहिती करून घेत आहेत. त्याचबरोबर तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाशी चिन्हांबाबत माहिती विचारत असल्याने तहसील कार्यालयाने २७ डिसेंबर रोजी परिसरात दर्शनी भागावर लावलेल्या चिन्हाच्या यादीजवळ थांबून चिन्हावर नजर फिरवत हे चिन्ह योग्य राहील, अशी आपापसात चर्चा करतानाचे चित्र तहसील कार्यालयात पहायला मिळत आहे. निवडणुकीत चिन्हाला मोठे महत्त्व आहे. चांगले आणि आकर्षक चिन्ह मिळावे यासाठी पॅनलप्रमुख धडपड करत असतात. अनेकांना यामध्ये यश मिळत असलेतरी अनेकांच्या पदरी निराशाच पडते. कारण, ते चिन्ह अगोदरच प्रतिस्पर्धी उमदेवाराला मिळालेले असते.

अशी आहेत चिन्ह

निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कपाट, सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बॅट, पुस्तक, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट, कंगवा, हिरा, कप-बशी, फुटबॉल, चश्मा, हॉकी, ईस्त्री, जग, केटली, चावी, लॅपटॉप, लुडो, कढाई, पेन ड्राईव्ह, कैची, अननस, छत्री, पांगुळगाडा, टोपली, फलंदाज, विजेचा खांब, डिश अँटेना, ऊस, बासुरी, मिक्सर, पंचिंग मशीन, फ्रीज, शिवण, यंत्र, स्कूटर, सोफा, बिगुल, तुतारी, टाईप राईटर, अक्रोड, कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर, सिटी, चिमटा, नांगर अशा १९० चिन्हांचा समावेश आहे.

Web Title: Option of 190 symbols in front of the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.