आवास योजनेसाठी ना-हरकत प्रमाणपत्राचे आदेश द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:20 AM2021-09-26T04:20:26+5:302021-09-26T04:20:26+5:30

परभणी : जायकवाडी कालव्याच्या परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जलसंपदा विभागातून ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश ...

Order no-objection certificate for housing scheme | आवास योजनेसाठी ना-हरकत प्रमाणपत्राचे आदेश द्यावेत

आवास योजनेसाठी ना-हरकत प्रमाणपत्राचे आदेश द्यावेत

googlenewsNext

परभणी : जायकवाडी कालव्याच्या परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जलसंपदा विभागातून ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

शहरातील जायकवाडी कालव्याच्या बाजूला अतिरिक्त जागेवर दलित, मागासवर्गीय, बौद्ध व अल्पसंख्यांक समाजाचे लोक मागील ४० वर्षांपासून वास्तव्याला आहेत. या भागातील नागरिकांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यासाठी जायकवाडी विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मनपाकडून मागितले जाते. त्यामुळे या प्रमाणपत्राअभावी झोपडपट्टी भागातील लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या जागेवर शासनाच्या योजना राबविण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विजय वाकोडे यांनी केली.

Web Title: Order no-objection certificate for housing scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.