परभणी जिल्हाधिकाºयांचे आदेश :...तर कर्मचाºयांचे वेतन अदा करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:34 AM2018-01-12T00:34:01+5:302018-01-12T00:34:06+5:30
तहसील कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना आधार बेसड् बायोमॅट्रिक बंधनकारक असून, जे कर्मचारी या पद्धतीत हजेरी सादर करणार नाहीत, अशा कर्मचाºयांचे वेतन अदा करू नयेत, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तहसील कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना आधार बेसड् बायोमॅट्रिक बंधनकारक असून, जे कर्मचारी या पद्धतीत हजेरी सादर करणार नाहीत, अशा कर्मचाºयांचे वेतन अदा करू नयेत, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत़
जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता यावी आणि नागरिकांची कामे व्हावीत, या उद्देशाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील कर्मचाºयांना आधार बेसड् बायोमॅट्रिकच्या सहाय्यानेच हजेरी नोंदविण्याचे आदेश दिले आहेत़ मात्र महसूल प्रशासनातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी या हजेरीला विरोध केला होता़ तलाठी, मंडळ अधिकारी हे फिल्डवर असतात़ त्यामुळे या कर्मचाºयांना आधार बेसड् बायोमॅट्रिक बंधनकारक करू नये, अशी मागणी केली होती़ मात्र जिल्हाधिकाºयांनी ही मागणी फेटाळून लावली होती़ त्यानंतर तलाठी व मंडळ अधिकाºयांना २१ डिसेंबर २०१७ पर्यंत आधार बेसड् बायोमॅट्रिकसाठी नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते़ त्यानंतरही अनेक तलाठी व मंडळ अधिकाºयांनी नोंदणी केली नाही़ ही बाब जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निदर्शनास आली़ त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ११ जानेवारी रोजी स्वतंत्र परिपत्रक काढले आहे़ त्यात आधार बेसड् बायोमॅट्रिक संदर्भात जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना नव्याने निर्देश दिले आहेत़ त्यानुसार आधार बेसड् बायोमॅट्रिकची नोंदणी न करणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचेही या पत्रकात नमूद केले आहे़ ज्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी अद्यापपर्यंत आधार बेसड् बायोमॅट्रिक मशीनद्वारे उपस्थिती नोंदविण्यासाठी रितसर नोंदणी केली नाही, त्यांनी अशी नोंदणी तत्काळ करावी, असे निर्देशही या परिपत्रकात देण्यात आले आहेत़ दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी आधार बेसड् बायोमॅट्रिक उपस्थितीती बंधनकारक केल्यामुळे कर्मचाºयांची उपस्थिती वाढली आहे़ ग्रामीण पातळीवरही ही प्रक्रिया सुरू केल्यास ग्रामस्थांच्या अडचणी सुटण्यास मदत होणार आहे़ त्यामुळे ग्रा़पं़स्तरावर याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे़
२ फेब्रुवारीपर्यंत तहसीलदारांकडे उपस्थिती दाखल करा
आधार बेसड् बायोमॅट्रिक उपस्थिती नोंदविण्या संदर्भात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सर्व विभागप्रमुखांना यापूर्वीच निर्देश दिले होते़ जानेवारी महिन्यातील उपस्थिती ही आधार बेस्ड बायोमॅट्रिक पद्धतीनेच घेतली जाणार आहे़ त्यामुळे १ जानेवारी २०१८ पासून प्रत्येक महिन्यात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी महिनाभराची दैनंदिनी पुढील महिन्याच्या २ तारखेपर्यंत तहसीलदारांकडे सादर करावी़ जे तलाठी, मंडळ अधिकारी ही दैनंदिनी सादर करणार नाहीत, त्यांचे त्या महिन्याचे वेतन अदा करू नये, असे निर्देशही या परिपत्रकात तहसीलदारांना देण्यात आले आहेत़ जिल्ह्यातील बहुतांश तलाठी आणि मंडळ अधिकाºयांनी अद्याप नोंदणीच केली नाही़ त्यामुळे या कर्मचाºयांची जानेवारी महिन्यातील १० तारखेपर्यंतची उपस्थिती कशी नोंदविणार व त्यावर काय कारवाई होणार? याविषयी प्रश्न निर्माण होत आहेत़