१४० पैकी केवळ २५ पालकांनी दिले संमतीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:47 AM2020-12-04T04:47:57+5:302020-12-04T04:47:57+5:30
विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्यके विद्यार्थ्याची काळजी घेतली जात आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. जे विद्यार्थी ...
विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्यके विद्यार्थ्याची काळजी घेतली जात आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. जे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाहीत, त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. पाचवी ते बारावीचे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेत आहेत.
आर. पी. तलवारे, मुख्याध्यापक
आतापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेतले. परंतु, प्रत्यक्ष शिक्षकांसमोर शिक्षण घेणे ही वेगळीच व आनंददायी बाब आहे. शिवाय अनेक दिवसांनंतर वर्गमित्रांची समोरासमोर भेट झाली. आलेल्या अडचणींचे सरांनी तात्काळ निरसन केले. याचा आनंद आहे. ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष शिक्षण घेण्याचा आनंद वेगळाच आहे.
वर्षा रौंदळे, विद्यार्थिनी, वर्ग दहावी