परिस्थितीवर मात करीत आकाशची पीएसआयपर्यंत झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:57+5:302021-01-14T04:14:57+5:30

तालुक्यातील शेंडगा या गावचा आकाश वाव्हळे मूळचा रहिवासी. डोंगरी भाग असल्याने उपजिविकेसाठी शेती आणि मजुरीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध ...

Overcoming the situation, the sky jumped to PSI | परिस्थितीवर मात करीत आकाशची पीएसआयपर्यंत झेप

परिस्थितीवर मात करीत आकाशची पीएसआयपर्यंत झेप

Next

तालुक्यातील शेंडगा या गावचा आकाश वाव्हळे मूळचा रहिवासी. डोंगरी भाग असल्याने उपजिविकेसाठी शेती आणि मजुरीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत रोहीदास व्हावळे आणी पत्नी सुलोचनाबाई या स्वत: अशिक्षित असतानाही आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. रोहिदास वाव्हळे यांना पाच मुले आहेत. त्यापैकी परमेश्वर, राजकुमार, प्रशांत हे भारतीय सैन्य दलात सीमेवर देशसेवेचे अनमोल कर्तव्य बजावत आहेत. मोठा मुलगा संजय व्हवळे शेती करतो. तर सर्वात लहान असलेल्या आकाशने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करीत जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी आकाशला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हरंगुळपर्यंत पायपीट करावी लागली. दहावी इयत्तेत तो शाळेतून प्रथम आला. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर आकाशने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात आकाश उत्तीर्ण झाला आहे. या परीक्षेतून आकाशची पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. आकाश व्हावळे पोलीस उपनिरीक्षक होणारा गावातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.

Web Title: Overcoming the situation, the sky jumped to PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.