नजरचूक बेतली महिलेच्या जिवावर; 'बीपी'ची समजून घेतल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या

By मारोती जुंबडे | Published: April 7, 2023 05:20 PM2023-04-07T17:20:00+5:302023-04-07T17:20:34+5:30

वालूर येथील घटना; महिलेची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

Overlooked gets woman's life; women took 'BP' perceived rat killer pills | नजरचूक बेतली महिलेच्या जिवावर; 'बीपी'ची समजून घेतल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या

नजरचूक बेतली महिलेच्या जिवावर; 'बीपी'ची समजून घेतल्या उंदीर मारण्याच्या गोळ्या

googlenewsNext

सेलू : उच्च रक्तदाब या आजाराचे नियमितपणे औषध घेणाऱ्या महिलेने नजरचुकीने उंदीर मारण्याच्या घेतले. त्यानंतर या महिलेला तत्काळ परभणी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रियंका संतोष टेकाळे (रा. वालूर) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

वालूर येथे प्रियंका संतोष टेकाळे (२८) या महिलेने नियमितपणे घेत असलेले बीपीच्या औषधी गोळ्या समजावून नजरचुकीने ४ एप्रिल रोजी सायंकाळी उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या खाल्या. काही वेळाने महिलेस उलटी होऊन त्रास सुरू झाल्याने वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला. त्यानंतर महिलेस परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

मात्र, या महिलेची प्रकृती चिंताजनक होत असल्याने पुढील उपचारासाठी ५ एप्रिल रोजी परभणीहून छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना वाटेतच या महिलेची प्राणज्योत मालवली. केवळ नजरचूक जिवावर बेतल्याची दुर्घटना वालूर येथे समजताच शोककळा पसरली. अनिल शामराव टेकाळे यांनी खबर दिल्यावरून सेलू पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांंनी दिली आहे. तपास पोहेकाँ अशोक हिंगे हे करीत आहेत.

Web Title: Overlooked gets woman's life; women took 'BP' perceived rat killer pills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.