परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पंडितराव चोखट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:49 PM2018-05-15T15:49:13+5:302018-05-15T15:49:13+5:30

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वरपूडकर गटाचे पंडितराव चोखट यांनी बोर्डीकर गटाचे उमेदवार विजय जामकर यांचा ५ मतांनी पराभव करीत विजय संपादन केला.

Panditrao Chokhat, President of Parbhani District Bank | परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पंडितराव चोखट

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पंडितराव चोखट

googlenewsNext
ठळक मुद्दे अध्यक्षपदासाठी माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी ३ दाखल केले होते बँकेचे उपाध्यक्ष तथा वरपूडकर यांचे समर्थक पंडितराव चोखट व रामप्रसाद बोर्डीकर गटाचे विजय जामकर यांनी प्रत्येकी १ अर्ज दाखल केला होता.

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वरपूडकर गटाचे पंडितराव चोखट यांनी बोर्डीकर गटाचे उमेदवार विजय जामकर यांचा ५ मतांनी पराभव करीत विजय संपादन केला. 

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पार पडली़. अध्यक्षपदासाठी माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी ३ तर बँकेचे उपाध्यक्ष तथा वरपूडकर यांचे समर्थक पंडितराव चोखट व रामप्रसाद बोर्डीकर गटाचे विजय जामकर यांनी प्रत्येकी १ अर्ज दाखल केला होता. वरपूडकर यांच्या अर्जाला भाजपाचे हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे यांनी आक्षेप घेतला. वरपूडकर हे प्रक्रिया मतदार संघातून निवडून आले आहेत. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी या मतदार संघातून निवडून आलेला सदस्य पात्र होवू शकत नाही, असा आक्षेप आ़ मुटकुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविला. त्यानंतर सहकार अधिनियम कलम ७३ (ड) अंतर्गत वरपूडकर यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला.

त्यामुळे वरपूडकर गटाकडून पंडितराव चोखट यांचा अर्ज कायम राहिला. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले़. यामध्ये चोखट यांना ११ तर जामकर यांना ६ मते मिळाली़. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चोखट यांना ५ मतांनी विजयी घोषित केले़. बँकेचे संचालक लक्ष्मणराव दुधाटे यांनी तटस्थ भूमिका घेतली़. 

या निवडणुकीत वरपूडकर यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्याची माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी केलेली खेळी यशस्वी ठरली़. यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून बरीच व्यूहरचना सोमवारपासून करण्यात आली होती. त्यामध्ये भाजपा नेत्यांना काही अंशी यश मिळाले आहे़. वरपूडकर हे स्वत:च  अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते़ परंतु, त्यांचाच अर्ज बाद ठरल्याने त्यांचे समर्थक चोखट यांच्या विजयानंतर वरपूडकर समर्थकांनी फारसा जल्लोष केला नाही़.

Web Title: Panditrao Chokhat, President of Parbhani District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.