परभणी : केरवाडीत चिकनगुनियाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:53 PM2017-12-12T23:53:36+5:302017-12-13T00:28:38+5:30
तालुक्यातील केरवाडी येथे दोन दिवसांपासून चिकनगुनियाची साथ पसरली असून, दोन दिवसांमध्ये ३० रुग्णांना त्याची लागण झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम : तालुक्यातील केरवाडी येथे दोन दिवसांपासून चिकनगुनियाची साथ पसरली असून, दोन दिवसांमध्ये ३० रुग्णांना त्याची लागण झाली आहे़
केरवाडीतील नवीन वसाहत परिसरात ही साथ सुरू असून, दोन दिवसांमध्ये ३० रुग्णांना लागण झाली आहे़ रुग्ण खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेत असून, आजाराने त्रस्त झाले आहेत़ असे असताना आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरकले नाहीत़ त्यामुळे ही साथ आटोक्यात आणावी, अशी मागणी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे़ या निवेदनावर सरपंच तात्याराव करवर, आप्पासाहेब जाधव, सुनील जाधव, बंडू जाधव, शिवाजी जाधव, परमेश्वर जाधव, आत्मलिंग तुपकर आदींच्या स्वाक्षºया आहेत़
केरवाडी येथील ग्रामस्थांनी चिकनगुनिया आजारासंदर्भात तक्रार केली आहे़ आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना पाठवून तेथील पाहणी करून साथ पसरणार नाही, याची दक्षता घेऊ़ तसेच रुग्णांवर उपचार केले जातील़
-डॉ़ कालिदास निरस, तालुका आरोग्य अधिकारी