परभणी : उड्डाणपुलावर पकडला १३४ ग्रॅम गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:33 AM2019-12-23T00:33:05+5:302019-12-23T00:33:31+5:30
शहरातील उड्डाण पुलावरून एका चारचाकी गाडीतून वाहून नेत असलेला १३४ ग्रॅम गांजा आणि विदेशी दारुच्या चार बाटल्या असा साठा पोलिसांनी शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जप्त केला आहे़ या प्रकरणी सहा जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील उड्डाण पुलावरून एका चारचाकी गाडीतून वाहून नेत असलेला १३४ ग्रॅम गांजा आणि विदेशी दारुच्या चार बाटल्या असा साठा पोलिसांनी शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जप्त केला आहे़ या प्रकरणी सहा जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे हे अवैध वाहनांवर कारवाई करण्यासाठी शनिवारी रात्री या भागातून जात असताना एका स्कॉर्पिओ गाडीविषयी त्यांना संशय आला़ त्यामुळे त्यांनी ही गाडी थांबविली़ या गाडीसोबतच आणखी एक मोटारसायकल देखील होती़ या गाडीची तपासणी केली असता, त्यात दारु आणि गांजा असल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे शासकीय पंचासमक्ष या प्रकाराचा पंचनामा करण्यात आला़ तेव्हा गाडीमध्ये १३४ ग्रॅम गांजा आणि विदेशी दारुच्या चार बाटल्या आढळल्या़ पोलिसांनी गांजा आणि दारुसह एक चारचाकी गाडी व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे़ या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गजेंद्र सरोदे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हे करीत आहेत़