परभणी : वर्षभरात ७३ नवजात बालकांचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:28 PM2020-02-29T22:28:58+5:302020-02-29T22:30:50+5:30

एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विविध कारणांवरुन ० ते ५ वर्षे वयोगटातील ७३ बालकांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. या कालावधीत ३ मातांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

Parbhani: 1 infant dies during the year | परभणी : वर्षभरात ७३ नवजात बालकांचा झाला मृत्यू

परभणी : वर्षभरात ७३ नवजात बालकांचा झाला मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विविध कारणांवरुन ० ते ५ वर्षे वयोगटातील ७३ बालकांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. या कालावधीत ३ मातांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची जन्मसंख्या, मृत्यू, सर्वात कमी वजनाची बालके आदी संदर्भातील बाबींचा आढावा घेण्यात येतो. या बाबतची माहिती केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत येणाऱ्या हेल्थ मॅनेजमेंट इनफर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस) अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येत असते. या अनुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच याबाबत शासनाला माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या १० महिन्यांच्या कालावधीत ० ते ५ वर्षे वयोगटातील ३८ मुली व ३५ मुले अशा ७३ नवजात अर्भक व बालकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत २ आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत १ अशा दोन मातांचा बाळंतपणात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एचएमआयएसच्या अहवालानुसार राज्यात १ एप्रिल २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत १२ हजार १४७ अर्भकांचा मृत्यू झाला असून ११ हजार ६६ बालमृत्यू व नवजात मृत्यू झाले आहेत. तसेच १ एप्रिल २०१९ ते १५ जानेवारी २०२० या कालावधीत १ हजार ७० मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तत्त्पूर्वी २०१८-१९ या कालावधीत १३ हजार ७० नवजात बालकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एचएमआयएसच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. अकाली जन्मास आलेले बालक, जन्मत: कमी वजनाचे बालक, जंतू संसर्ग, न्यूमोनिया, सेप्सीस, जन्मत: श्वासावरोध, आघात, रेस्पिरेटरी, डिस्ट्रेट सिंड्रोम आदी कारणांमुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमदू करण्यात आले आहे.
बालमृत्यू , मातामृत्यू: कमी करण्यासाठी या योजना
४ १३ व्या वित्त आयोगांतर्गत इंन्टेसीफाईड एचबीएनसी, होम बेस्ड केअर फॉर यंग चाईल्ड, जंत नाशक व जीवनसत्व अ मोहीम, अ‍ॅनिमियामुक्त भारत, अतिसार नियंत्रण पंधरवडा, ३५ अतिसंवेदनशील तालुक्यांचे सनियंत्रण, आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, नवजात शिशू स्थीरकरण कक्ष,
४नवजात शिशू कोपरा, बालउपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रातील आशामार्फत अतिसार, न्यूमोनिया व सेप्सीस आजारांचे व्यवस्थापन
४ भरारी पथक योजना, मातृत्व अनुदान योजना, दायी बैठक योजना, मान्सूनपूर्व उपाययोजना, नियमित लसीकरण, बालमृत्यू अन्वेषण, माता आरोग्य संबंधी योजना, गरोदरपणातील संपूर्ण तपासणी व उपचार, संस्थात्मक प्रसुती,
४जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना आदी योजना या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात बालमृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Parbhani: 1 infant dies during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.