परभणी : १ लाख मे.टन अतिरिक्त चाऱ्याचे केले नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:34 PM2019-01-15T23:34:37+5:302019-01-15T23:35:03+5:30
जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ४ लाख २४ हजार ४०४ जनावरांना नऊ महिने चारा पुरेल यासाठी २० जुलै २०१९ पर्यंत ६ लाख ८७ हजार ५३७ मे.टन चारा उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात चाºयाची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने १ लाख मे.टन अतिरिक्त चाºयाचे नियोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ४ लाख २४ हजार ४०४ जनावरांना नऊ महिने चारा पुरेल यासाठी २० जुलै २०१९ पर्यंत ६ लाख ८७ हजार ५३७ मे.टन चारा उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात चाºयाची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने १ लाख मे.टन अतिरिक्त चाºयाचे नियोजन केले आहे.
यावर्षी जिल्ह्यात जून व जुलै हे दोन महिने सोडले तर समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामात शेतकºयांना चारा पिके घेता आली नाहीत. त्याच बरोबर परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने रबी हंगामातही पेरणी झाली नाही. परिणामी शेतकºयांकडे जनावरांसाठी चाराच उपलब्ध झाला नाही.
जिल्ह्यातून वाहणाºया दुधना, गोदावरी, पूर्णा, करपरा, लेंडी आदी नद्यांना पाणी उपलब्ध नसल्याने नदीकाठावरील शेतकरीही यावर्षी पेरता झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणी व चारा टंचाईच्या झळा पशुपालकांना बसत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यामध्ये ४ लाख २४ हजार ४०४ एकूण पशूधन उपलब्ध आहे. त्यामध्ये ३ लाख ६२ हजार ७९३ मोठ्या जनावरांची संख्या आहे. ९१ हजार ३१० लहान जनावरांची संख्या आहे. तर १ लाख ५९ हजार ५५९ शेळ्या-मेंढ्यांची जिल्ह्यात संख्या आहे. एका पशूधनास दररोज ६ किलो प्रमाणे चारा लागतो. त्यामुळे दिवसाकाठी २ हजार ५४६ मे.टन चाºयाची आवश्यकता आहे. ७६ हजार ३९३ मे.टन चाºयाची एका महिन्यासाठी गरज भासणार आहे. त्यामुळे २० जुलै २०१९ पर्यंत म्हणजेच येत्या सात महिन्यांसाठी जिल्ह्याला ६ लाख ८७ हजार ५३७ मे.टन चाºयाची आवश्यकता भासणार आहे.
जिल्हा प्रशासन व पशूसंवर्धन विभागाच्या वतीने ५ लाख ९० हजार ८०० मे.टन चाºयाचे नियोजन केले आहे; परंतु, यातही जिल्ह्यातील पशूधनाला कमरता भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले असून राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत गाळपेरा क्षेत्रात वैरण विकास कार्यक्रम त्याच बरोबर सिंचनाची सोय असलेल्या इतर शेतकºयांना मका, वैरण बियाणे वाटप योजना अंमलात आणली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १० हजार लाभार्थ्यांना जवळपास १०० मे.टन वैरण बियाणांचे वाटप या योजनेंतर्गत वाटप करण्यात येणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार हेक्टर क्षेत्रावर अतिरिक्त चारा पिके घेण्यात येणार आहेत. त्यातून जिल्हा प्रशासनाकडे १ लाख मे.टन चाºयाची अतिरिक्त उपलब्धता होणार आहे.
असे आहे चाºयाचे नियोजन
पशूसंवर्धन विभागाकडून ४ लाख २४ हजार ४०४ पशूधनाला २० जून २०१९ पर्यंत लागणाºया ५ लाख ९० हजार ८०० मे.टन चाºयाचे नियोजन केले आहे. यामध्ये २०१८-१९ च्या खरीप हंगामातून ३ लाख ९५ हजार ८०० मे.टन चारा उपलब्ध होणार आहे. २०१८-१९ च्या रबी हंगामातून ७४ हजार ५०० मे.टन चाºयाची उपलब्धता होईल, अशी अपेक्षा आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील जंगल, वनक्षेत्र, चराऊ कुरण, बांधावरील व पडिक जमिनीच्या माध्यमातून ३० हजार मे.टन चारा मिळणार आहे. त्याच बरोबर शेतकºयांच्या शेतावरील वैरण पिकापासून ४० हजार ३०० मे.टन वैरण विकास योजनेंतर्गत ५० हजार २०० मे.टन असा एकूण २० जूनपर्यंत ५ लाख ९० हजार ८०० मे.टन चारा उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात चाºयाची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अतिरिक्त उपाययोजनेतून १ लाख मे.टन चाºयाचे उत्पन्न घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात अपेक्षित असलेल्या ६ लाख ८७ हजार ५३७ मे.टन चाºयापैकी ६ लाख ९० हजार ८०० मे.टन चारा उपलब्ध होणार आहे.