परभणी : मृत महिलेसह १४ जण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:15 PM2020-04-10T23:15:18+5:302020-04-10T23:15:46+5:30

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. सदरील महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यासोबत इतर १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी आतापर्यंत तरी दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.

Parbhani: 1 Negative with dead woman | परभणी : मृत महिलेसह १४ जण निगेटिव्ह

परभणी : मृत महिलेसह १४ जण निगेटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. सदरील महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यासोबत इतर १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी आतापर्यंत तरी दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.
परभणी तालुक्यातील एक महिला मंगळवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. सदरील महिलेस कोरोना सदृश्य लक्षणातील श्वसनचा त्रास होत होता. त्यामुळे सदरील महिलेस या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. बुधवारी दुपारी या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या महिलेच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल तब्बल दोन दिवसानंतर जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. तो निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने सुटकेना नि:श्वास टाकला आहे. असे असले तरी या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, प्रशासनाला मयत महिलेसह अन्य १३ कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबचे अहवालही शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही एक दिलासादायक बाब आहे. असे असले तरी शुक्रवारी पुन्हा शासकीय रुग्णालयामध्ये १८ नवीन संशयित दाखल झाले. त्यांचे स्वॅब घेऊन ते तपासण्यासाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत २८७ संशयितांची नोंद घेण्यात आली असून त्यातील २४२ जणांचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यातील २०६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून २० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत १६ जणांचे स्वॅब तपासण्याची आवश्यकता नसल्याचे अहवाल प्रयोगाशाळेने दिला आहे. जिल्ह्यातील ११४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून २८ जण शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात आहेत. १४५ जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे.
आता मास्क घालणे प्रत्येकाला बंधनकारक
४कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आता प्रत्येकाला मास्क घालणे पोलिसांच्या वतीने बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा वेगाने प्रसार होतो. त्यामुळे जिल्ह्यात फिरतांना नागरिकांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावूनच फक्त अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडावे. मास्क किंवा रुमाल न वापरता भाजीपाला, किराणा साहित्य, औषधी आदी घ्यायचे आहे, अशी कारणे सांगून घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत कोणी घालू नये, अन्यथा त्यालाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असाही इशारा दिला आहे.
पोलिसांना चकवा दिलेले ६ जण होम क्वारंटाईनमध्ये
४पाथरी: जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्या तरी बाहेरुन येणाºयांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. मिळेल त्या मार्गाने ग्रामस्थ गावी परतत आहेत. १० एप्रिल रोजी पोलिसांना चकवा दिलेल्या ६ जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. आतापर्यंत तालुक्यात २७८ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात बाहेरगावाहून येणाºया नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे; परंतु, बाहेरगावाहून येणाºया ग्रामस्थांचा ओघ सुरुच आहे. ९ एप्रिल रोजी तालुक्यातील गुंज येथे एक, १० एप्रिल रोजी कासापुरी, रामपुरी येथील एकास आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. तर वडी येथे एक जण बाहेरगावाहून आल्याने त्यास पाथरी येथे आणण्यासाठी गेलेले दोघेजण, अशा एकूण ६ जणांना आरोग्य विभागाने गावामध्ये होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के.पी.चौधरी यांनी दिली.
दोन संशयितांचे घेतले स्वॅब
४सोनपेठ: येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोघांचे १० एप्रिल रोजी स्वॅब घेण्यात आले असून हे स्वॅब पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ.सिद्धेश्वर हालगे यांनी दिली. सोनपेठ शहरात ९ एप्रिल रोजी दोघे जण दाखल झाले होते.या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता या दोघांचे स्वॅब घेऊन त्यांना ग्रामीण रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Web Title: Parbhani: 1 Negative with dead woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.