परभणी: निकृष्ट खत विकणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:58 PM2019-09-14T23:58:29+5:302019-09-14T23:58:53+5:30

निकृष्ट व अप्रमाणित खत विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी खत उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.

Parbhani: 1 offense against 3 people selling inferior fertilizer | परभणी: निकृष्ट खत विकणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा

परभणी: निकृष्ट खत विकणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): निकृष्ट व अप्रमाणित खत विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी खत उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.
मानवत येथील कृषी विभागाच्या पथकाने ५ मे २०१९ रोजी शहरातील गणेश अ‍ॅग्रो एजन्सी या दुकानाची तपासणी केली. त्यावेळी गोवा राज्यातील झुआरी अ‍ॅग्रो केमिकल्स लि. या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट (दाणेदार खत) विक्रीसाठी ठेवले होते. या खताचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार हे नमुने अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे उत्पादक कंपनीने निकृष्ट दर्जाचे खत उत्पादन करुन वितरण व विक्री केल्या प्रकरणी कृषी विभागाने कंपनीला ८ दिवसांपूर्वी नोटीस दिली होती. मात्र कंपनीने केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने तालुका कृषी अधिकारी पी.एच. कच्छवे यांनी १३ सप्टेंबर रोजी मानवत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन झुआरी कंपनीचे व्यवस्थापक गजानन जयराम कवट यांच्यासह कंपनीचे मालक, संचालक, रसायनशास्त्रज्ञ व व्यवस्थापकाविरुद्ध शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे, ४ सप्टेंबर रोजी पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष तमशेटे यांच्या फिर्यादीवरुन याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. आता हा दुसरा गुन्हा झाला आहे.

Web Title: Parbhani: 1 offense against 3 people selling inferior fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.