परभणी : दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:35 AM2019-01-02T00:35:29+5:302019-01-02T00:36:15+5:30
येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगावॅट वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी): येलदरी प्रकल्पातील पाणी जलविद्युत केंद्रातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडल्याने या केंद्रातील वीज निर्मिती करणारे संच सुरू झाले असून, दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे़ साधारणत: १० दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, या संपूर्ण काळात १०० मेगावॅट वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे़
जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पावर येलदरी धरण बांधण्यात आले आहे़ याच ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्रही कार्यरत आहे़ सध्या येलदरी धरणामध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी येलदरी प्रकल्पातील पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्याची मागणी जोर धरत होती़ हे पाणी नदीपात्रात सोडल्याने २० ते २५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे़ शेतकºयांकडून होत असलेल्या मागणीची दखल घेऊन ३१ डिसेंबर रोजी दुपारी प्रकल्पातील पाणी जलविद्युत प्रकल्पातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे़ राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता टी़एस़ चौधरी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी़एम़ डांगे, एऩडी़ महाजन, जे़एस़ डांगे, एसक़े़ रामदास, एस़टी़ गांजवे, एस़डी़ गायकवाड, एस़बी़ शिराळे, मनोज बºहाटे, सुरक्षा अधिकारी पी़डी़ साबदे, तंत्रज्ञ एस़डी़ लांडगे, आऱई़ भंडारी, के़ डी़ माकोडे, शेख महेमूद, कलकुट्टी, डी़डी़ पत्की, व्ही़डी़ टाकरस, पी़पी़ वाकोडकर आदी कर्मचारी वीज निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत़
या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्याद्वारे दररोज १० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे़ प्रकल्पामधून दररोज ५ दलघमी पाणी १० दिवसांपर्यंत सोडण्यात येणार असून, या माध्यमातून सुमारे १०० मेगावॅट विजेची निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे़
५० वर्षांपूर्वी उभारलेला प्रकल्प
४स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत येलदरी प्रकल्पावर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे़
४या प्रकल्पास ५० वर्षे पूर्ण झाले असून, या ५० वर्षामध्ये हा प्रकल्प एकदाही बिघडला नाही किंवा बंद राहिला नाही़ हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये आहे़
४या केंद्राला आयएसओ २००९-१० मानांकनही मिळाले आहे़ तत्कालीन आशिया कंपनीने या ठिकाणी वीजनिर्मिती संच बसविले असून, ते आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत़
४सध्या या प्रकल्पामध्ये ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, या पाण्यातून ३़५८ दशलक्ष युनिट वीज तयार होवू शकते, अशी माहिती केंद्रातील अधिकाºयांनी दिली़
तीनपैकी दोन संच सुरू
४येलदरी येथील वीज निर्मिती प्रकल्पामध्ये विजेची निर्मिती करणारे एकूण ३ संच आहेत़ सोमवारी वीज निर्मिती प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे दोन प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत़
४एका प्रकल्पाची वीजनिर्मितीची क्षमता ७़५ मेगावॅट एवढी असून, तीनही संच पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यास २२़५ मेगावॅट विजेची निर्मिती होते़ पाण्याचा दाब कमी असल्याने १० मेगावॅट विजेची निर्मिती सध्या होत आहे़