परभणी : १० महिलांवर होणार शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:36 AM2019-02-28T00:36:24+5:302019-02-28T00:37:27+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत २ मार्च रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचारासाठी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात गर्भपिशवीचा आजार असलेल्या १० महिलांवर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत २ मार्च रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत जिल्हा सामान्य रुग्णालयात १३ आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचारासाठी महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात गर्भपिशवीचा आजार असलेल्या १० महिलांवर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्त्रीयांच्या गर्भ पिशवीच्या आजाराचे निदान व उपचार, रक्तदाब व मधुमेह तपासणी, मौखिक आरोग्य व मुख कर्करोग तपासणी, मुत्रपिडांचे आजार, सर्व प्रकारच्या कर्करोगाचे निदान, मानसिक रोगाची तपासणी, लहान मुलांचे आजार, पोटाचे विकार व उपचार आदी १३ आजारांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. पुरुषांच्या वैद्यकीय कक्षामध्ये १८ बेड महिलांच्या गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.
यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांच्या मार्गदर्शनाखाली शरद कदम यांच्यासह कर्मचारी, अधिकारी परिश्रम घेत आहेत.
गोल्डन कार्डचे वाटप
राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात २७ फेब्रुवारी रोजी खा. संजय जाधव यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत १२० लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर रक्तदान शिबीर पार पडले. शनिवारी आयोजित महाआरोग्य मेळाव्याचा जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.