परभणी : १०६ रोजंदारी कामगार सेवेत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:56 AM2019-01-10T00:56:08+5:302019-01-10T00:56:59+5:30

येथील महानगरपालिकेत २७ मार्च २००० पर्यंत कार्यरत असलेल्या १०६ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता महापालिकेत एकही रोजंदारी कामगार शिल्लक राहिलेला नाही. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न निकाली निघाला आहे.

Parbhani: 106 wages in the daily wages of the workers | परभणी : १०६ रोजंदारी कामगार सेवेत कायम

परभणी : १०६ रोजंदारी कामगार सेवेत कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महानगरपालिकेत २७ मार्च २००० पर्यंत कार्यरत असलेल्या १०६ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता महापालिकेत एकही रोजंदारी कामगार शिल्लक राहिलेला नाही. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न निकाली निघाला आहे.
शहर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये रोजंदारी तत्त्वावर कामगारांना सेवेत घेतले होते. या कर्मचाºयांना मनपातून स्थानिक स्तरावर मोबदला अदा केला जात होता. या कामगारांना सेवेत कायम करावे, अशी मागणी कामगार संघटनांनी मागील काही वर्षांपासून केली होती. या मागणीची दखल घेऊन तत्कालीन महापौर प्रताप देशमुख, संगीता वडकर यांच्या कार्यकाळात महापालिकेतील १३६ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तत्कालीन मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्या कार्यकाळात हा प्रस्ताव पठाविण्यात आला होता. दरम्यान, या प्रस्तावापैकी ३५ कामगारांना यापूर्वीच सेवेत कायम करण्यात आले होते. उर्वरित कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी महापौर मीनाताई वरपूडकर, सभागृहनेते भगवान वाघमार, आयुक्त रमेश पवार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैैैसकर यांच्याकडे पाठपुरावा केला.
परभणीतून दाखल झालेल्या प्रस्तावानंतर राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील १४०० रोजंदारी कामगारांना कायम करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे, या निर्णयामुळे परभणी महापालिकेतील सर्वाधिक १०६ कामगार सेवेत कायम झाले आहेत.
४रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी कामगार संघटनेचे अध्यक्ष के.के. आंधळे, राज्याध्यक्ष डी.पी. शिंदे, सचिव आनंद मोरे, महानगर अध्यक्ष बाबाराव आघाव, अभिजीत कुलकर्णी, सतीश राऊत, अण्णासाहेब देशमुख, रामेश्वर कुलकर्णी, उमेश जाधव, मावई, प्रकाश गायकवाड आदींनी पाठपुरावा केला.
४या निर्णयामुळे महापालिकेंतर्गत रोजंदारी तत्त्वावर काम करणाºया शिक्षक, सेविका, शिपाई, लिपिक, वैद्यकीय अधिकारी या पदावरील कर्मचाºयांना लाभ झाला आहे़ त्यामुळे आता महापालिकेत एकही रोजंदारी कर्मचारी शिल्लक राहिला नसल्याचे कर्मचारी संघटनेने सांगितले.

Web Title: Parbhani: 106 wages in the daily wages of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.