परभणी : कारवाईत ११५ किलो प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:24 AM2018-10-07T00:24:43+5:302018-10-07T00:25:00+5:30
नगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ आॅक्टोबर रोजी शहरात राबविण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत चार व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन ११५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी ): नगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ आॅक्टोबर रोजी शहरात राबविण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत चार व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन ११५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
राज्य शासनाने प्लास्टिक व कॅरिबॅग वापरावर बंदी घातल्यानंतरही शहरात याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे नगरपालिका व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने ६ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपासून शहरात प्लास्टिक वस्तू व कॅरिबॅग बंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मुख्याधिकारी उमेश ढाकणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आर.आर. मातकर, उबेद चाऊस, ए.व्ही.देशपांडे, ओम चव्हाण, दीपक भदर्गे, सुनील कीर्तने, दीपक झिंझुर्डे यांच्या पथकाने बाजारपेठेतील दुकानात तपासणी केली. तेव्हा शहरातील चार दुकानात प्लास्टिकच्या साहित्यासह कॅरिबॅग आढळून आली. या चार दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करीत प्लास्टिक ग्लास, द्रोण व कॅरिबॅग असे ११५ किलो प्लास्टिक तसेच कॅरिबॅग जप्तीची कारवाई करण्यात आली. दरम्यान, दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी शहरातील व्यापाºयांनी त्यांच्याजवळ असलेल्या कॅरिबॅग नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडे जमा कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी ढाकणे यांनी केले आहे.