परभणी : दुसºया दिवशी १२ हजार रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:19 AM2018-02-15T00:19:42+5:302018-02-15T00:21:03+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबिरात १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या दरम्यान तब्बल १२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ हजार महिला रुग्ण तर दंत रोगाच्या १६०० रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले असल्याची माहिती आ.डॉ.राहुुल पाटील यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबिरात १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या दरम्यान तब्बल १२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७ हजार महिला रुग्ण तर दंत रोगाच्या १६०० रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले असल्याची माहिती आ.डॉ.राहुुल पाटील यांनी दिली.
शहरातील नूतन विद्या मंदिर शाळेच्या मैैदानावर शिवसेनेच्या वतीने १३ फेब्रुवारीपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंगळवारी शहरातील ९ हजार ७०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
दुसºया दिवशी शहरातील तब्बल १२ हजार रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामध्ये ६७३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रियेसाठी दीड हजार रुग्णांना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी औरंगाबाद, पुणे, मुंबई, उदगीर, नांदेड व परभणी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
तसेच १७ फेब्रुवारी रोजी सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात विशेषत: हृदयरोग, कान, नाक, घसा, गर्भाशयाचे आजार, ग्रंथीचे विकार, क्षयरोग, कर्करोग, बालरोग, मूत्ररुग्ण, मानसिक आरोग्य आदी आजारांचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत.
अंशुमनवर होणार मुंबईत उपचार
शहरातील अंशुमन कल्याण काळे हा अवघ्या अडीच वर्षाचा बालक महाआरोग्य शिबिरात तपासणीसाठी आला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यास एक किडनी असून दुसरी व्यवस्थित काम करत नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे आ.डॉ.राहुल पाटील यांच्यामार्फत अंशुमनवर मुंबई येथील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत.