परभणी : १३ हजार उत्पादक तूर विक्रीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:50 AM2018-06-09T00:50:00+5:302018-06-09T00:50:00+5:30
जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रावर १७ हजार ४५० तूर उत्पादकांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी केवळ ४ हजार ७६० शेतकऱ्यांचा शेतमाल राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत खरेदी करण्यात आला़ त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या १३ हजार तूर उत्पादक शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रावर १७ हजार ४५० तूर उत्पादकांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती़ त्यापैकी केवळ ४ हजार ७६० शेतकऱ्यांचा शेतमाल राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत खरेदी करण्यात आला़ त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या १३ हजार तूर उत्पादक शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत़
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात नाफेडकडून ७ हमीभाव खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू करण्यात आली़ त्यासाठी जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रावर १७ हजार ४५० तूर उत्पादकांनी आपला शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केली़
राज्य शासनाने दोन वेळा दिलेल्या मुदत वाढीत केवळ ४ हजार ७६० शेतकºयांची तूर हमीभाव खरेदी केंद्र प्रशासनाकडून खरेदी करण्यात आली़ त्यामुळे १३ हजार तूर उत्पादक अजूनही तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत़ सध्या मृग नक्षत्राचा पाऊस जिल्ह्यात सुरू झाला आहे़ त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीबरोबरच मशागतीच्या कामांत शेतकरी गुंतला आहे़ त्यातच हमीभावाने तूर विक्रीसाठी नोंदणी करूनही चार-चार महिने तूर विक्री होत नसल्याने तूर उत्पादक चिंतेत आहेत़ त्यामुळे तूर खरेदी केंद्रास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी तूर उत्पादकांतून होत आहे़
हरभºयाला मिळाली मुदतवाढ
हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीपाठोपाठ४ हजार ६६५ हरभरा उत्पादक शेतकºयांनी हरभरा विक्रीसाठी केंद्र प्रशासनाकडे नोंदणी केली होती़ परंतु, राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत केवळ ७९३ शेतकºयांचा १० हजार ६६० क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आली़ जवळपास ४ हजार शेतकºयांची खरेदी बाकी होती़ त्यामुळे राज्य शासनाने नोंदणी केलेल्या शेतकºयांचा हरभरा १५ जूनपर्यंत खरेदी करण्यास मुदतवाढ दिली़ मात्र हमीभाव खरेदी केंद्राचा भोंगळ कारभार पाहता राज्य शासनाने दिलेल्या मुदतवाढीत या शेतकºयांचा हरभरा खरेदी होईल का? याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे़