परभणी : अवैध वाळू वाहतुकीचे चौदा ट्रक ताब्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:27 AM2018-04-15T00:27:58+5:302018-04-15T00:27:58+5:30

अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने विटा-मुदगल रोडवरून जात असल्याची माहिती या भागातील ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला दिल्यानंतर १४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास महसूलच्या अधिकाऱ्यांनी सूत्रे हलविली आणि एका मागून एक जात असलेले १४ हायवा ट्रक ताब्यात घेतले़ या ट्रकमध्ये ५६ ब्रास वाळू असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे़ या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाºयांमध्ये जरब बसली आहे़

Parbhani: 14 trucks carrying illegal sand traffic! | परभणी : अवैध वाळू वाहतुकीचे चौदा ट्रक ताब्यात !

परभणी : अवैध वाळू वाहतुकीचे चौदा ट्रक ताब्यात !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने विटा-मुदगल रोडवरून जात असल्याची माहिती या भागातील ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला दिल्यानंतर १४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास महसूलच्या अधिकाऱ्यांनी सूत्रे हलविली आणि एका मागून एक जात असलेले १४ हायवा ट्रक ताब्यात घेतले़ या ट्रकमध्ये ५६ ब्रास वाळू असल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे़ या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाºयांमध्ये जरब बसली आहे़
पाथरी, गंगाखेड, पालम हा भाग गोदावरी नदीच्या परिसरातील आहे़ गोदावरी घाटावरील अनेक वाळू धक्के लिलावामध्ये सुटले आहेत़ लिलावाच्या नियमांचे उल्लंघन करीत दिवसरात्र वाळू उपसा सुरू असल्याने मागील काही महिन्यांपासून महसूल प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे़ सोनपेठ तालुक्यातील लासिना येथील वाळू धक्क्याचा लिलाव झाला आहे़ मात्र या धक्क्यावरून रात्री-बेरात्री अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जात असल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू होता़ लासीना भागातून येणारी वाहने थेट पाथरी तालुक्यातील विटा मार्गे निघून जात असत़ सातत्याने वाहनांची वाहतूक होत असल्याने विटा येथील ग्रामस्थांनी १३ एप्रिल रोजी वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर नजर ठेवली़ रात्री ११ वाजेच्या सुमारास लासिना वाळू घाटातून येणारी वाहने थेट पाथरी तालुक्यातील मुदगल-विटा रस्त्याने जात होती़ येथील ग्रामस्थांनी तहसीलदार वासुदेव शिंदे यांना मोबाईलवरून ही माहिती दिली़ त्यानंतर तहसीलदार शिंदे यांच्यासह तलाठी आरक़े़ कोल्हे, बिडवे, चिपटे, पोलीस निरीक्षक व्ही़व्ही़ श्रीमनवार हे १४ एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी १४ हायवा ट्रक पथकाने ताब्यात घेतले़
अंधाराचा फायदा घेऊन काही वाहन चालकांनी वाहने घेऊन पोबारा केला़ दरम्यान, १४ एप्रिल रोजी सकाळी उपजिल्हाधिकारी सी़एस़ कोकणी आणि महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला़
सर्व वाहनांमध्ये अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कारवाईची प्रक्रिया सुरू
विटा येथे पकडलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांसंदर्भात उपजिल्हाधिकारी सी़ एस़ कोकणी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, या वाहनांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत़ पुढील कारवाई सुरू आहे. त्यामुळे या वाहनांवर दंडात्मक कारवाई होते की, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला जातो, याबाबत मात्र उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही़
पाथरी तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाळूचे साठा प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे़ क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा केला जात आहे़ दोन महिन्यांपूर्वीच एका प्रकरणात महसूल प्रशासनाने कंत्राटदारावर कारवाई केली होती़ त्यानंतर आता तब्बल १४ वाहने मध्यरात्री पकडल्याने अवैध वाळू उपशाची गती किती मोठी आहे हे दिसून येत आहे़
या वाहनांवर केली कारवाई
विटा येथे अवैध वाळू वाहतूक करताना १४ हायवा ट्रक पकडण्यात आले आहेत़ या ट्रकचा पंचनामाही पूर्ण झाला असून, पंचनाम्यातील उपलब्ध माहितीनुसार एमएच ४४/९५३१ (चार ब्रास), एमएच २० बीटी-३१०७ (४ ब्रास), एमएच ४३ ई- ७११४ (४ ब्रास), एमएच ४२ टी-००९६ (४ ब्रास), एमएच ०६ एक्यू-६५९१ (४ ब्रास), एमएच ४५ टी-६८६३ (४ ब्रास), एमएच ४४ यू-५७७७ (४ ब्रास), एमएच ३२ डी- ९६८० (४ ब्रास), एमएच १३ एएक्स-४१०३ (४ ब्रास), एमएच ४४/ ११९२ (४ ब्रास), टीएन ८७-टीएमपी-७७०८ (४ ब्रास), एमएच ०६ एक्यू-६१३४ (४ ब्रास), एमएच १२ आयएफ -८८९९ (४ ब्रास),एमएच १२ एफयू- ६७०७ (४ ब्रास) या वाहनावर कारवाई करण्यात आली़

Web Title: Parbhani: 14 trucks carrying illegal sand traffic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.