परभणी : लोकन्यायालयात १६९७ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:18 PM2019-03-17T23:18:23+5:302019-03-17T23:18:53+5:30

येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली़

Parbhani: 16 9 7 cases were filed in the local court | परभणी : लोकन्यायालयात १६९७ प्रकरणे निकाली

परभणी : लोकन्यायालयात १६९७ प्रकरणे निकाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये १६९७ प्रकरणांत तडजोड करून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यात ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली़
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये रविवारी राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली़ परभणी जिल्हा न्यायालयात सकाळी १०़३० वाजता प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फलके यांच्या हस्ते लोक न्यायालयाचे उद्घाटन झाले़ यावेळी जिल्हा न्यायाधीश ए़एम़ पाटील, वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड़ मनोज कुंभारीकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव शेख अकबर शेख जाफर यांनी प्रास्ताविकात लोकन्यायालयातील पॅनल विषयी माहिती दिली़ अध्यक्षीय समारोप करताना प्रमुख जिल्हा सत्र न्या़ उर्मिला जोशी म्हणाल्या, जास्तीत जास्त प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवून ती निकाली काढावीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कुलकर्णी यांनी केले़ न्या़ एस़एस़ खिरापते यांनी आभार मानले़ या लोकन्यायालयामध्ये फौजदारी, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्यांची सेवाविषयक प्रकरणे, महसूल, दिवाणी आणि बँकेची वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात आली होती़ त्यात दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या ५४० प्रकरणांमध्ये तडजोड झाली़ त्यातून ६ कोटी ८२ लाख ५६ हजार १ रुपयांची वसुली झाली़ तसेच ११५७ वाद दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात २ कोटी ६६ लाख ३२ हजार ६८६ रुपये वसूल झाले़ दोन्ही मिळून १६९७ प्रकरणे निकाली निघाली असून, ९ कोटी ४८ लाख ८८ हजार ६८७ रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती न्यायालयाच्या सूत्राने दिली़
पाथरीत २८ प्रकरणे निकाली
पाथरी तालुका विधि सेवा समितीच्या वतीने आयोजित लोक न्यायालयात २८ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ पाथरी न्यायालयात आयोजित या लोक न्यायालयास बँक व्यवस्थापक दास, उपशाखा व्यवस्थापक डी़एम़ गोयले, वसुली प्रतिनिधी प्रकाश मोरे यांची उपस्थिती होती़ या लोकन्यायालयात भारतीय स्टेट बँक कृषी शाखेने ४० वादपूर्व प्रकरणे ठेवली होती़ त्यापैकी २८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली़ त्यात ५१ लाख ४२ हजार रुपयांपैकी २६ लाख ९२ हजार रुपये जमा करण्यात आले़ तडजोड प्रकरणे ३१ मार्चपर्यंत पूर्ण केली असून, कृषी क्षेत्रातील कर्ज प्रकरणात तडजोड झाल्यानंतर लाभधारकास नवीन कर्ज दिले जाईल, असे शाखा व्यवस्थापक दास यांनी सांगितले़

Web Title: Parbhani: 16 9 7 cases were filed in the local court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.