परभणी : १६ सेवा झाल्या आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:19 AM2018-03-18T00:19:21+5:302018-03-18T00:19:28+5:30

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १ मार्च २०१८ पासून मोटारवाहन विभागाच्या १६ सेवा आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना घरबसल्या या सेवांच्या माध्यमातून सुविधा मिळणार आहेत.

Parbhani: 16 service is online | परभणी : १६ सेवा झाल्या आॅनलाईन

परभणी : १६ सेवा झाल्या आॅनलाईन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १ मार्च २०१८ पासून मोटारवाहन विभागाच्या १६ सेवा आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना घरबसल्या या सेवांच्या माध्यमातून सुविधा मिळणार आहेत.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहनधरकांना जवळपास ६७ सेवा दिल्या जातात. त्यापैकी आधीच २२ सेवा ह्या आॅनलाईन झाल्या होत्या. परंतु, १ मार्चपासून मोटार वाहन विभागाच्या १६ सेवांचे कामकाज आॅनलाईन करण्यात आले आहे. यामध्ये वाहन हस्तांतरण, मयत व्यक्तींच्या नावावरील वाहन हस्तांतरण नोंद, लिलाव प्रक्रियेत विक्री करण्यात येणाऱ्या वाहनांच्या नोंदी, आरसीवरील पत्ता बदल, वाहनावर कर्ज बोजा नोंदविणे, वाहनावरील कर्ज बोजा रद्द केल्याची नोंद घेणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे, वाहनास नाहकरत प्रमाणपत्र देणे, वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, प्रमाणपत्र नुतनीकरण व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ठरविणे, वाहनातील बदल केल्याची नोंद घेणे, योग्यता प्रमाणपत्राची दुय्यम पत्र जारी करणे, वाहनाची पूर्ननोंदणी करणे, वाहनांच्या प्रकारात बदल करणे, वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणे, नवीन व्यवसाय प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे, कर भरणे या १६ सेवा परिवहन विभागाच्या ६६६. स्रं१्र५ंँंल्ल.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांमुळे वाहनधारकांना व नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कामासाठी महिना-महिना हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही.

Web Title: Parbhani: 16 service is online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.