परभणी : घरकुलासाठी आणखी ५६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:27 AM2019-08-12T00:27:32+5:302019-08-12T00:28:05+5:30

शहरातील रमाई घरकुल आणि प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले असून शासनाने या योजनेसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.

Parbhani: 2 crore more for households | परभणी : घरकुलासाठी आणखी ५६ कोटी

परभणी : घरकुलासाठी आणखी ५६ कोटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील रमाई घरकुल आणि प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले असून शासनाने या योजनेसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.
शहरातील जलपूनर्भरण आणि वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या सभागृहात नागरिकांसमवेत बैठक पार पडली. यावेळी आयुक्त रमेश पवार, आरोग्य सभापती सचिन देशमुख, डॉ. राजगोपाल कालानी, शंकर आजेगावकर, डॉ. रविंद्र केंद्रेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिजीत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
या बैठकीत बोलताना आयुक्त रमेश पवार म्हणाले, परभणी शहरामध्ये रमाई घरकुल योजनेचे ४५ कोटी रुपये पडून होते. यावर्षी १ हजार ९०० घरकुलांना मंजुरी देऊन या पैशांचा विनियोग केला. त्यामुळे शासनाने पुन्हा ५६ कोटी रुपये दिले आहेत. परिणामी ही योजना यशस्वी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात एकूण ७० हजार मालमत्ता असून त्यापैकी ५० हजार मालमत्तांवर येत्या वर्षभरात जलपूनर्भरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेला यावर्षी अडीच हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. मनपाने आतापर्यंत १० हजार झाडे लावली आहेत. बांधकाम परवानगीच्या वेळी जलपुनर्भरणाची अट घालण्यात आली आहे. रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा शेवटचा हप्ता देण्यापूर्वी जलपूनर्भरण व वृक्षलागवड केली असल्यासच हा हप्ता दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. यापुढेही शहरामध्ये वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करुन वृक्ष लावली जाणार आहेत. नागरिकांनी आपल्या घरासमोर किमान दोन झाडे लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी डॉ.राजगोपाल कालानी, शंकर आजेगावकर, डॉ. रवींद्र केंद्रेकर, संजय ठाकरे, उद्यान निरीक्षक पवन देशमुख, मोहम्म अथर, बचतगटातील महिला सदस्या लता गायकवाड, अन्नपूर्णा मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकूंद कुलकर्णी, संकीर्ण विभागप्रमुख राजकुमार जाधव, पवन देशमुख, मो.अथर, पंकज देशमुख, सुभाष मस्के, पठाण आदींनी प्रयत्न केले.
वृक्षारोपणासाठी : मोकळ्या जागांचा होणार वापर
४परभणी शहरात वृक्षारोपण मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. महानगरपालिकेने दिलेले उद्दिष्ट केव्हाच पूर्ण केले आहे. यापुढेही शहरामध्ये वृक्षारोपण सुरुच राहणार आहे. महापालिकेच्या अंतर्गत डॉ.अंकिरा वाकी यांच्या संकल्पनेतून माऊली गार्डन येथे झाडे लावली जात आहेत. या ठिकाणी ७२१ झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच शहरातील चारही उद्यांनाबरोबरच जिंतूररोडवरील नवीन दत्तनगर, युसूफ कॉलनी, मुमताजनगर, दर्गारोड या ठिकाणी झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
४शहरामध्ये संरक्षित भिंत असलेल्या ज्या मोकळ्या जागा आहेत, त्या जागाही झाडे लावण्यासाठी वापरल्या जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त रमेश पवार यांनी दिली. शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन लावले आहे. दररोज शहरातील संपूर्ण कचरा उचलला जात असून घनकचºयाचे व्यवस्थापन करणारा प्रकल्प उभारणीचे काम जवळपास पूर्णत्वाला आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर शहरामध्ये सर्व रस्त्यांवर एलईडी लाईट बसविले असून असे काम करणारी परभणी मनपा एकमेव असल्याचे पवार म्हणाले.

Web Title: Parbhani: 2 crore more for households

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.