परभणी :८ हजार रुग्णांवर २१ कोेटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:51 AM2018-04-08T00:51:58+5:302018-04-08T00:51:58+5:30

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात आरोग्य विभागाने विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या ८ हजार ३८७ रुग्णांवर २१ कोटी १५ लाख रुपये खर्च केला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी ही योजना संजीवनी ठरत असली तरी अजूनही तळागळापर्यंत योजनेची माहिती पोहचली नाही. त्यामुळे प्रभावी जनजागृती केली तर जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकेल.

Parbhani: 21 coatings cost on 8 thousand patients | परभणी :८ हजार रुग्णांवर २१ कोेटींचा खर्च

परभणी :८ हजार रुग्णांवर २१ कोेटींचा खर्च

Next

मारोती जुंबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात आरोग्य विभागाने विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या ८ हजार ३८७ रुग्णांवर २१ कोटी १५ लाख रुपये खर्च केला आहे. गोरगरीब रुग्णांसाठी ही योजना संजीवनी ठरत असली तरी अजूनही तळागळापर्यंत योजनेची माहिती पोहचली नाही. त्यामुळे प्रभावी जनजागृती केली तर जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकेल.
दारिद्र्य रेषेखाली आणि १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी २०१३ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासनाच्या वतीने सुरु करण्यात आली. या योजनेत प्रति लाभार्थी दीड लाख रुपयांपर्यत खर्च शासनाकडून केला जात होता. या योजनेअंतर्गत पांढरे रेशन कार्ड वगळता इतर रेशनकार्ड धारकांनी व एक लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी या योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा देण्यात आली होती. राज्यामध्ये तीन वर्षे सलग दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने राज्यातील शेतकरी वर्गांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करुन घेतले. या योजनेअंतर्गत नोंदणी करुन शेतकºयांनाही उपचार घेता येऊ लागले. जिल्हा सामान्य रुग्णालय व शासनाच्या वतीने या योजनेचा प्रसार व प्रचारही करण्यात आला. २०१३ ते २१ मे २०१७ पर्यंत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३२ हजार ४९२ कुटुंबांची या योजनेत नोंदणी झाली होती. त्यापैकी २० हजार ९६० रुग्णांनी या योजनेअंतर्गत राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतले होते. या रुग्णांवर ५० कोटी रुपयांचा खर्चही करण्यात आला होता.
त्यानंतर या योजनेला वाढता प्रतिसाद पाहता राज्य शासनाने १ जुलै २०१७ पासून या योजनेचे महात्मा फुले जन आरोग्य योजना असे नामांतर केले. या योजनेअंतर्गत उपचार घेणाºया रुग्णांना २ लाख रुपयापर्यंतचा खर्च करण्यात येत आहे. तसेच राज्यातील कोणत्याही दवाखान्यात या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेचे नामांतर झाल्यानंतर २०१७-१८ या एका आर्थिक वर्षात जिल्ह्यात ८ हजार ३८७ रुग्णांनी या योजनेअंतर्गत उपचार घेतले आहेत. यावर आरोग्य विभागाच्या वतीने तब्बल २१ कोटी १५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
तालुकानिहाय उपचार घेतलेले रुग्ण व खर्च
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८ हजार ३८७ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यांच्यावर २१ कोटी १५ लाख ९ हजार ४४६ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील ८७८ रुग्णांची उपचार घेतला आहे. या रुग्णांवर २ कोटी ५१ लाख ७८ हजार, जिंतूर १ हजार २८० रुग्णांवर ३ कोटी २१ लाख २२ हजार ३००, मानवत ५४४ रुग्णांवर १ कोटी ३९ लाख १ हजार ६२४, पालम ४२५ रुग्णांवर १ कोटी १० लाख ७० हजार ७६२, परभणी २ हजार ४६२ रुग्णांवर ६ कोटी १४ लाख ५७ हजार ५७०, पाथरी ६५९ रुग्णांवर १ कोटी ७९ लाख ४० हजार ८०, पूर्णा ८५३ रुग्णांवर २ कोटी १८ लाख ६२ हजार ६५०, सेलू ८४७ रुग्णांवर २ कोटी २५ लाख ७४ हजार २६०, सोनपेठ ४३९ रुग्णांवर १ कोटी ६२ हजार ४०० असा खर्च करण्यात आला आहे.
१२८ आजारांचा होईना समावेश
२०१३ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्य शासनाने अंमलात आणली. या योजनेअंतर्गत गोरगरीब रुग्णांना ९७१ आजारांवर उपचार घेता येत होता. ही योजना राबविताना येणाºया अडचणी लक्षात घेता या योजनेचे १ जुलै २०१७ पासून महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नामांतर करण्यात आले. नामांतराबरोबरच नवीन १२८ आजारांचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे या योजनेअंतर्गत रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारच्या ११०० आजारावर उपचार घेण्याची सुविधा निर्माण झाली. परंतु, गेल्या एक वर्षापासून नवीन १२८ आजारांचा यात समावेश झाला नाही. त्यामुळे राज्य शासनाने केवळ योजनेचे नामांतर करुनच समाधान मानले की काय, असा प्रश्न रुग्णांमधून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Parbhani: 21 coatings cost on 8 thousand patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.