परभणी : २१ दलघमी पाण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:14 AM2018-02-04T00:14:25+5:302018-02-04T00:14:38+5:30
परभणी शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पात केलेले पाण्याचे आरक्षण कमी पडणार असून आणखी २१ दलघमी पाणी या प्रकल्पात आरक्षित केल्यास परभणीचा जुलै महिन्यापर्यंतचा पाणीप्रश्न मिटणार आहे. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण वाढवावे, अशी सूचना जिल्हाधिकाºयांनी गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पात केलेले पाण्याचे आरक्षण कमी पडणार असून आणखी २१ दलघमी पाणी या प्रकल्पात आरक्षित केल्यास परभणीचा जुलै महिन्यापर्यंतचा पाणीप्रश्न मिटणार आहे. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण वाढवावे, अशी सूचना जिल्हाधिकाºयांनी गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडे केली आहे.
परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा होतो. या बंधाºयात यापूर्वी सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी घेतले जात होते. मात्र सध्या या प्र्नकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने निम्न दुधना प्रकल्पावरच शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असून या प्रकल्पात पाण्याचे आरक्षण वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
निम्न दुधना प्रकल्पामध्ये ३० दलघमी पाणी परभणी आणि पूर्णा या दोन शहरांसाठी आरक्षित केले होते. दरम्यान, १७ व १८ नोव्हेंबर रोजी पूर्णा प्रकल्पातून राहटी बंधाºयात सोडलेले पाणी गेटची फळी निघून गेल्याने वाहून गेले होते. या बंधाºयाची पाणीसाठवण क्षमताही केवळ १ दलघमी एवढीच आहे. त्यामुळे परभणी व पूर्णा या दोन शहरांसाठी प्रत्येकी १ दलघमी असे पाणी घेण्यात आले. यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून संयुक्त ८ दलघमी पाण्याचे आवर्तन दिले होते.
२ संयुक्त आरक्षणात प्रकल्पातील १६ दलघमी पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे परभणीसाठी निम्न दुधना प्रकल्पात केवळ १४ दलघमी पाणी शिल्लक राहणार असून हे पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरविणे अवघड आहे. सध्याच्या उपलब्ध आरक्षणानुसार जुलै महिन्यामध्ये परभणी शहरासाठी पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
सिद्धेश्वर प्रकल्पातील पाणीसाठाही कमी होत आहे. त्यामुळे सिद्धेश्वर प्रकल्पातील पाणी न मिळाल्यास परभणी शहरासाठी आणखी तीन आवर्तन द्यावे लागतील, या सर्व बाबींचा विचार करता प्रकल्पात आणखी २१ दलघमी पाणी आरक्षित करावे लागेल, असे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांना कळविले आहे. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ होणे अपेक्षित आहे.
साडेचार दलघमी पाण्याचा वापर
परभणी शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ८ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. हे ८ दलघमी पाणी सिद्धेश्वर प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्पातून उपलब्ध होईल, असे गृहित धरले होते. त्यानुसार निम्न दुधना प्रकल्पामध्ये ३० दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. प्रत्यक्षात १७ नोव्हेंबर रोजी सिद्धेश्वर प्रकल्पातून ५.३९५ दलघमी पाणी सोडण्यात आले. राहटी प्रकल्पात १ दलघमी पाणी उपलब्ध झाले. त्यापैकी केवळ ०.५० दलघमी पाण्याचा वापर झाला. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमीचे संयुक्त आवर्तन सोडण्यात आले. त्यातून १ दलघमी पाणी उपलब्ध झाले. त्यानंतर परभणी मनपासाठी ७ दलघमीचे एक स्वतंत्र आवर्तन घेण्यात आले. त्यानंतर परभणी व पूर्णासाठी एक संयुक्त आवर्तन आणि परभणी शहरासाठी आणखी एक स्वतंत्र आवर्तन असे ३० दलघमी पाण्यातून केवळ ४ दलघमी पाणी शहराला मिळणार आहे. उर्वरित ४ दलघमी पाण्याची आवश्यकता असून हे पाणी न मिळाल्यास जुलै महिन्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. तेव्हा संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये आणखी २१ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्याची आवश्यकता आहे.
निम्न दुधनावरच परभणीकरांची भिस्त
परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयात आतापर्यंत येलदरी प्रकल्पातून पाणी घेतले जात होते. यावर्षी या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने निम्न दुधना प्रकल्पातून पाणी घेतले जात आहे. या प्रकल्पात पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. मात्र जुलै महिन्यापर्यंतचे नियोजन लक्षात घेता आरक्षणात वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे.