परभणी : २२ दुचाकी चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:31 AM2018-12-25T00:31:36+5:302018-12-25T00:32:06+5:30

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोहिमेस सुरुवात केली असून, दारू पिवून वाहन चालविणाऱ्या २२ दुचाकी चालकांवर रविवारी रात्री कारवाई करण्यात आली़ जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली़

Parbhani: 22 Action for Two Wheelers | परभणी : २२ दुचाकी चालकांवर कारवाई

परभणी : २२ दुचाकी चालकांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोहिमेस सुरुवात केली असून, दारू पिवून वाहन चालविणाऱ्या २२ दुचाकी चालकांवर रविवारी रात्री कारवाई करण्यात आली़ जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली़
३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते़ यात मद्य प्राशनाचाही समावेश असतो़ दारू पिवून वाहन चालविल्याने अपघात वाढण्याची शक्यता निर्माण होते़ दरवर्षी ३० डिसेंबर रोजी आशा वाहन चालकांवर कारवाई केली जाते़ यावर्षी मात्र पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशावरून २३ डिसेंबरपासूनच कारवायांना सुरुवात केली आहे़ जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रमुख मार्गावर नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली़ त्यात नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरया हॉस्पीटलजवळ एका आॅटोरिक्षा चालकावर कारवाई करण्यात आली आहे़ तर चुडावा बस थांबा, गंगाखेड शहरातील परळी नाका येथे २, चारठाणा टी पॉर्इंट, जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालय, दैठणा रस्ता, शहर वाहतूक शाखेने उड्डाणपूल, गव्हाणे रोड, स्टेशन रोड, नानलपेठ पोलीस ठाण्यांतर्गत गंगाखेड नाका तसेच इतर ठिकाणी तीन कारवाया करण्यात आल्या़ परभणी- जिंतूर रस्ता, पूर्णा, पाथरी नाका, सोनपेठ टी पॉर्इंट, बोरी-जिंतूर रस्ता आदी ठिकाणी दारू पिवून वाहन चालविणाºया वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्या अन्वये कारवाई करण्यात आली आहे़
जुगार खेळणाºया २० जणांना अटक
रविवारी रात्री पोलिसांनी मटका जुगाराविरूद्धही कारवाईचा धडका लावला़ जिंतूर, सेलू, चारठाणा, गंगाखेड आणि परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापे टाकून २० आरोपींना अटक करण्यात आली़ या आरोपींकडून ३२ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़

Web Title: Parbhani: 22 Action for Two Wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.