परभणी : फळ लागवड योजनेसाठी अडीच कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:53 AM2018-07-24T00:53:09+5:302018-07-24T00:55:59+5:30

भाऊसाहेब फुुंडकर फळ लागवड योजना २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राबविण्यात येत आहे़ फळबागांच्या लागवडीसाठी शासकीय अनुदान देण्यात येणार आहे़ त्यासाठी परभणी जिल्ह्याला २ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़

Parbhani: 2.5 crore fund for fruit plantation scheme | परभणी : फळ लागवड योजनेसाठी अडीच कोटींचा निधी

परभणी : फळ लागवड योजनेसाठी अडीच कोटींचा निधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भाऊसाहेब फुुंडकर फळ लागवड योजना २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राबविण्यात येत आहे़ फळबागांच्या लागवडीसाठी शासकीय अनुदान देण्यात येणार आहे़ त्यासाठी परभणी जिल्ह्याला २ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़
परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात ५ लाख हेक्टर क्षेत्र व रबी हंगामात अडीच लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत पेरणी केली जाते़ परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांनी दोन्ही हंगामातील पिकांवर केलेला खर्च उत्पादनातून निघून नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत़ त्यामुळे शेतकºयांना खरीप व रबी हंगामातील पेरणीसाठी पैशांची गरज भासते़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पेरणीपूर्वी बँकांच्या दारामध्ये पीककर्जासाठी उभा राहतो़ यावर्षीही परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही़ या परिस्थितीमध्ये बदल करून शेतकºयांनी पारंपारिक पिकांबरोबरच फळ लागवडीकडे वळावे, यासाठी राज्य शासनाने १७ जुलैपासून राज्याचे दिवंगत कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या स्मरणार्थ भाऊसाहेब फुंडकर फळ लागवड योजना अंमलात आणली़
या योजनेंतर्गत १८ प्रकारच्या फळबागा अनुदान तत्त्वावर समाविष्ट करण्यात आल्या आहेत़ यामध्ये आंबा, काजू, पेरू, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फनस, अंजीर, चिकू (सर्व कलमे) या फळबागांचा समावेश करण्यात आला आहे़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांच्या कुटूंबातील उपजिवीका ही केवळ शेतीवर अवलंबून असली पाहिजे असे निकष लावण्यात आले आहेत़ या योजनेस १७ जुलैपासून २१ दिवसांपर्यंत तालुका कृषी अधिकाºयांकडे या योजनेसाठी प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे़ या योजनेतील लाभार्थ्यांना फळबागांच्या लागवडीसाठी २ कोटी ४८ लाख २० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे़
अशी लावावी लागणार झाडे
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतल्यानंतर लाभार्थ्याला आंब्याची प्रतिहेक्टरी १००, काजू २००, पेरू २७७, डाळींब ७४०, संत्रा २७७, नारळ १५०, सिताफळ ४००, आवळा २००, चिंच १००, जांभूळ १००, कोकम २००, फणस १००, अंजीर ७४० व चिकूची १०० झाडे लावावी लागणार आहेत़ यासाठी ३ टप्प्यात अनुदानाची रक्कम मिळणार आहे़ यामध्ये पहिल्या टप्प्यात ५० टक्के, दुसरा ३० टक्के व तिसरा २० टक्क्यानुसार अनुदान देण्यात येणार आहे़ हे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे़

Web Title: Parbhani: 2.5 crore fund for fruit plantation scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.