परभणी : गंगाखेड तालुक्यात सहा महिन्यात २६ जण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 12:05 AM2019-07-04T00:05:41+5:302019-07-04T00:06:03+5:30
जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत शहर व तालुक्यातून २६ जण आपल्या सहा बालकांसोबत बेपत्ता झाल्याची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात झाली आहे. यातील १३ जणांचा व त्यांच्या सोबत असलेल्या बालकांचा शोध लागला असला तरी उर्वरित १३ जण व ३ लहान मुले अद्यापही बेपत्ता असल्याने पोलीस अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत शहर व तालुक्यातून २६ जण आपल्या सहा बालकांसोबत बेपत्ता झाल्याची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात झाली आहे. यातील १३ जणांचा व त्यांच्या सोबत असलेल्या बालकांचा शोध लागला असला तरी उर्वरित १३ जण व ३ लहान मुले अद्यापही बेपत्ता असल्याने पोलीस अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत.
गंगाखेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शहर तसेच ग्रामीण भागातील वेगवेळ्या गावातून गत वर्षभरात २५ जण बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी यातील २३ जणांचा शोध लावला. त्यामध्ये तालुक्यातील नरळद येथून १ मे २०१८ रोजी बेपत्ता झालेली ३० वर्षीय महिला व ७ जुलै २०१८ रोजी शहरातील लहुजीनगर येथून बेपत्ता झालेली २६ वर्षीय या दोन महिला अद्यापही पोलिसांंना मिळून आल्या नाहीत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गेल्या वर्षभरात हरवलेल्या व्यक्तींची संख्या चालू वर्षात सहा महिन्यांच्या कालावधीत यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. ११ जानेवारी २०१९ ते १ जुलै २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण १२ पुरुष, ११ महिला व ३ तरूणी असे एकूण २५ जण ६ बालकांसोबत बेपत्ता झाल्याची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात आहे. त्यातच जुलै महिन्याच्या १ तारखेला शहरातील वकील कॉलनी परिसरातून १८ वर्षीय तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या मोठ्या बहिणीने दिल्यानंतर हरवल्याची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली. नोंद झाल्यानंतर दुसºयाच दिवशी ही तरुणी २ जुलै रोजी मिळून आली. सहा महिन्याच्या कालावधीत २५ जण हरवल्याची नोंद पोलीस डायरीत झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ६ पुरुष, ५ महिला, २ तरुणी व त्यांच्या सोबत असलेल्या ३ बालकांचा शोध लागला आहे. उर्वरित १३ जण व ३ बालकांचा शोध सुरू असल्याचे सपोनि भोगाजी चोरमले यांनी सांगितले.
हे आहेत अजूनही बेपत्ताच
च्२९ जानेवारी २०१९ रोजी शहरातील ममता कॉलनी परिसरातून बेपत्ता झालेल्या नबी खान रहेमतुल्ला खान पठाण (वय ३५), सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथून २७ मार्च २०१९ रोजी सुवर्णमाला विष्णू होरे (वय ३०), गंगाखेड शहरातून ७ मे २०१९ रोजी अश्विनी महादेव चाटे (वय २०,रा. भेंडेवाडी), ४ मे २०१९ रोजी बेपत्ता झालेली तरूणी क्रांती उर्फ मोनिका नारायण वंजारे (वय १९ , रा. मन्नाथ नगर, गंगाखेड), गंगाखेड शहरातील रोशन मोहल्ला येथून १४ मे २०१९ रोजी बेपत्ता झालेला तरूण सय्यद रहीम सय्यद खलील (वय २०), तालुक्यातील डोंगरगाव येथून १५ मे २०१९ रोजी सत्यभामा बळीराम चंदे (वय ४०), २५ मे २०१९ रोजी गंगाखेड शहरातून बेपत्ता झालेली नवविवाहिता अनुराधा नामदेव सुरवसे (वय १९, रा. मसनेरवाडी), माखणी येथून १७ मे २०१९ रोजी बेपत्ता झालेला तरूण विकास राजाराम भालेराव (वय २५), २५ सप्टेंबर २०१८ रोजी तालुक्यातील कौडगाव येथून बेपत्ता झालेले विष्णू भगवान मुंडे (वय ३५), १६ मार्च २०१९ रोजी बेपत्ता झालेले गोविंद रावसाहेब मुंडे (वय ३०, रा. ढवळकेवाडी), २३ मे २०१९ पासून लहान मुलीसह बेपत्ता झालेल्या भाग्यश्री दिगंबर चव्हाण (वय ३०), कोद्री येथून २१ जून २०१९ रोजी ६ वर्षी मुलगी व ५ वर्षीय लहान मुलासोबत बेपत्ता असलेल्या अनुराधा मोकिंंद सावंत (वय ३०) यांचा समावेश असून त्यांचा आजपर्यंत शोध लागला नाही, असे पोलीस डायरीत असलेल्या नोंदीवरून समोर आले आहे. बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या शोधार्थ पोलिसांनी विशेष मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यातून बोलल्या जात आहे.