परभणी : बँक, घरफोडीतील ५ आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:28 AM2019-07-27T00:28:12+5:302019-07-27T00:28:51+5:30

जिल्ह्यातील मानवत, पेडगाव येथील बँक आणि विविध ठिकाणची घरफोडी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ आरोपींना गुरुवारी उशिरा अटक केली आहे. या आरोपींकडून अनेक महत्त्वपूर्ण गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Parbhani: 3 accused in bank robbery, arrested | परभणी : बँक, घरफोडीतील ५ आरोपी जेरबंद

परभणी : बँक, घरफोडीतील ५ आरोपी जेरबंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील मानवत, पेडगाव येथील बँक आणि विविध ठिकाणची घरफोडी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ आरोपींना गुरुवारी उशिरा अटक केली आहे. या आरोपींकडून अनेक महत्त्वपूर्ण गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
परभणी तालुक्यातील पेडगाव तसेच मानवत येथे बँक फोडीची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. शिवाय जिल्ह्यात घरफोडी, वाहनांची चोरी आदी घटनाही घडल्या होत्या. चोरटे हाती लागत नसल्याने पोलीस यंत्रणेवर ताण आला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी बँक चोरी व दुकान फोडल्याच्या घटनेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचे आदेश त्यांच्या पथकास दिले. त्यानंतर मिळालेल्या फुटेजच्या आधारे गुप्त बातमीदाराकडून शोध घेतला असता मानवत तालुक्यातील खडकवाडी येथे आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन गुरुवारी स्थागुशाच्या पथकाने छापा टाकून अनिल मारोती पवार (३० रा.खडकवाडी ता.मानवत), लखन भीमराव एरंडकर (२०, रा.कारखाना वसमत), सुरज नितीन जाधव (२०, रा.सांगली ह.मु.कारखाना वसमत), सिन्ना ऊर्फ बालाजी नागोराव गोरे (२४, रा.कारखानारोड वसमत), आत्माराम मारोती पवार (३०, रा.खडकवाडी ता.मानवत) यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता आरोपींवर मानवत पोलीस ठाण्यात गु.रं.नं.१५६/२०१९ कलम ४५७, ३८० अन्वये बँक फोडणे, लुटमार आदींचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. तसेच परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात १६८/२०१९ कलम ४५७, ३८० भादंवि नुसार बँक फोडणे, पाथरी पोलीस ठाण्यात गु.र.नं.१६६/२०१९ कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये शटर तोडून चोरी करणे, परभणी कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं.१९०/२०१९ कलम ४५७, ३८० शटर तोडून चोरी करणे, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.४१४/२०१९ कलम ३७९ भादंवि अन्वये मोटारसायकल चोरणे, हट्टा पोलीस ठाण्यात गु.र.नं.१०६/२०१९ कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये शटर तोडून चोरी करणे, जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येलदरी येथील दारुचे दुकान फोडून चोरी करणे, पूर्णा पोलीस ठाणे हद्दीत दारुचे दुकान फोडून चोरी करणे आदी गुन्हे केल्याचे आरोपींनी कबुली दिली. यावेळी स्थागुशाच्या पथकाने आरोपीकडून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेला एक आॅटो, मानवत बँक फोडी प्रकरणात वापरलेली चोरीची मोटारसायकल हस्तगत केली असून या आरोपींना तपासकामी मानवत व परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सुनील गोपीनवार, पोह.सुग्रीव केंद्रे, हनुमंत जक्केवाड, निलेश भूजबळ, पो.ना.जमीर फारोखी, अरुण कांबळे यांच्या पथकाने केली.
गुन्ह्यांची : होणार उकल
४जिल्ह्यात बँक फोडणे, घरफोडी, दुकान फोडणे, वाहनांची चोरी करणे आदींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने या घटनेतील आरोपींचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते.
४त्या अनुषंगाने स्थागुशाचे पोनि.प्रवीण मोरे यांनी विशेष तपासशैलीचा वापर करुन आरोपीचा शोध घेतला आणि त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींकडून नांदेड, हिंगोली, अंबाजोगाई, बीड, मुंबई, उल्हासनगर आदी भागातील गुन्हे उघडकीस येण्याची दाखल शक्यता आहे.

Web Title: Parbhani: 3 accused in bank robbery, arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.