परभणी :‘डिग्रस’मध्ये १ टक्का पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:30 AM2019-08-12T00:30:09+5:302019-08-12T00:30:49+5:30
तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधारात केवळ १ टक्के पाणीसाठा झाला आहे़ त्यामुळे अजूनही गोदावरीचे पात्र कोरडेठाक असून, जायकवाडीच्या पाण्यावरच आशा विसंबून आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधारात केवळ १ टक्के पाणीसाठा झाला आहे़ त्यामुळे अजूनही गोदावरीचे पात्र कोरडेठाक असून, जायकवाडीच्या पाण्यावरच आशा विसंबून आहेत़
पालम तालुक्यात आॅगस्ट महिना अर्धा संपत आला तरीही पावसाने हजेरी लावलेली नाही़ हलक्या पावसावर पिकांना जीवदान मिळाले असले तरीही जनावरे व माणसासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतीशय कठीण बनलेला आहे़
डिग्रस या बंधाऱ्यावर पालम शहरासह पालम, पूर्णा तालुक्यातील जवळपास ३५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे़ जोरदार पाऊस न झाल्याने गोदावरीच्या पात्रात पाणी आले नाही़ गळाटी व लेंडी नदीला पूर आल्याने गोदावरीतील खड्डे काही ठिकाणी भरले असून, डिग्रसचा बंधाºयापर्यंत पाणी गेलेले आहे़ परंतु, हे पाणी अतिशय किरकोळ असून, केवळ १़३४ टक्के पाण्याचा साठा झाला आहे़ अजूनही पावसाचे पाणी पात्रात न आल्याने डिग्रस बंधारा कोरडाच आहे़ हा बंधारा भरला तरच पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
जागोजागी खड्डे भरले
गोदावरी नदीच्या पात्रात यावर्षी अवैध वाळू उपशामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत़ पात्रात तालुक्यातील फळा व आरखेड येथे दोन नद्या गोदावरीला येऊन मिळतात़ या नद्यांना मागील काही दिवसांपूर्वी पाणी आले होते़ या पुराचे पाणी गोदावरीच्या पात्रात शिरल्याने पात्रातील खड्डे जागोजागी भरलेले आहेत़