परभणी : इमारतीविनाच चालतात तीस अंगणवाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:23 AM2019-06-25T00:23:05+5:302019-06-25T00:23:42+5:30
अंगणवाडी कार्यकर्तीच्या हाती स्मार्ट फोन देऊन एकीकडे सुधारणा केल्या जात असताना दुसरीकडे तालुक्यातील ३० अंगणवाड्यांना अद्यापही स्वत:च्या इमारती नसल्याची बाब पुढे आली आहे. तर चार अंगणवाड्यांच्या इमारती धोकादायक बनल्याने आता प्रशासन काय पावले उचलते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): अंगणवाडी कार्यकर्तीच्या हाती स्मार्ट फोन देऊन एकीकडे सुधारणा केल्या जात असताना दुसरीकडे तालुक्यातील ३० अंगणवाड्यांना अद्यापही स्वत:च्या इमारती नसल्याची बाब पुढे आली आहे. तर चार अंगणवाड्यांच्या इमारती धोकादायक बनल्याने आता प्रशासन काय पावले उचलते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात अंगणवाड्या चालविल्या जातात. गावाच्या लोकसंख्येच्या आधारावर अंगणवाड्यांची संख्या अवलंबून असते. राज्य कुपोषण मुक्त करण्यासाठी शासन अंगणवाड्यांच्या माध्यमातूून विविध योजना राबविते. गरोदर माता, स्तनदा माता आणि पाच वर्षाच्या आतील बालकांना आहार पुरविला जातो. अंगणवाड्यांसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत आहेत. विशेष म्हणजे इमारतींसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला. गावपातळीवर लोकसहभागातून अंगणवाड्यांना आयएसओ नामांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले. आता प्रत्येक अंगणवाडी कार्यकर्तीच्या हातात स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अंगणवाडीचे सर्व व्यवहार आॅनलाईन होणार असले तरी तालुक्यातील ३० अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती देण्यास मात्र प्रशासन कमी पडले आहे.
१० अंगणवाड्या किरायाच्या जागेत
४पाथरी तालुक्यात १४२ अंगणवाड्या असून त्यातील २४ अंगणवाड्या मिनी अंगणवाड्या आहेत. ११२ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती आहेत. तर १० अंगणवाड्या किरायाच्या जागेत चालविल्या जातात.
४२० अंगणवाड्या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये भरविल्या जातात. तर ३० अंगणवाड्यांना अजूनही स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांना इमारत केव्हा मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मॉडेल लटकले
४राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २५ अंगणवाड्या मॉडेल बनविण्यासाठी अहवाल मागविला होता. मात्र पुढे त्यात काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे अंगणवाडींचे मॉडेल कागदोपत्री लटकले आहे.
पाथरी तालुक्यातील ४ इमारती धोकादायक
४तालुक्यातील उमरा, मुदगल, जैतापूरवाडी आणि रेणापूर येथील अंगणवाड्यांच्या इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या इमारती धोकादायक बनल्या असून याच इमारतीत अंगणवाडी भरविली जाते. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.