परभणी : ३३ रुग्णांचे बोनमॅरो जुळल्याचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:07 AM2019-07-15T00:07:24+5:302019-07-15T00:09:06+5:30

येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी परभणीत घेतलेल्या बोनमॅरो तपासणी शिबिरातील स्वॅब नमुन्यांची तपासणी अमेरिकेतील प्रयोगशाळेत करण्यात आली असून, त्यात ३३ रुग्णांचे बोनमॅरो त्यांच्या सख्या बहिण-भावांशी जुळल्याने आता या रुग्णांना पुढील उपचार करणे सोयीचे झाले आहे़

Parbhani: 33 cases of bone marrow matched patients | परभणी : ३३ रुग्णांचे बोनमॅरो जुळल्याचा अहवाल

परभणी : ३३ रुग्णांचे बोनमॅरो जुळल्याचा अहवाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी परभणीत घेतलेल्या बोनमॅरो तपासणी शिबिरातील स्वॅब नमुन्यांची तपासणी अमेरिकेतील प्रयोगशाळेत करण्यात आली असून, त्यात ३३ रुग्णांचे बोनमॅरो त्यांच्या सख्या बहिण-भावांशी जुळल्याने आता या रुग्णांना पुढील उपचार करणे सोयीचे झाले आहे़
परभणी येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपचे लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांच्या पुढाकाराने २४ एप्रिल रोजी दात्री इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या सहकार्याने परभणी येथे प्रथमच बोनमॅरो तपासणीचे शिबीर घेतले होते़ या शिबिरात राज्यासह पर राज्यातील १९९ रुग्णांच्या सख्या बहिण-भावांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते़ हे नमुने तपासणीसाठी हिस्टोजनिक इंडियाच्या वतीने अमेरिकेतील प्रयोगशाळेत पाठविले होते़ त्याचा अहवाल १२ जुलै रोजी प्राप्त झाला असून, १९९ रुग्णांपैकी ३३ रुग्णांच्या बहीण-भावांचे बोनमॅरो मॅच झाले आहेत़
त्यामुळे आता या रुग्णांना पुढील उपचार करणे सोयीचे होणार आहे़ राज्यात प्रथमच अशा प्रकारचे शिबीर परभणीत घेण्यात आले़ या शिबिरासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ़ अर्चना भायेकर, रक्त विकार तज्ज्ञ डॉ़ मनोज तोष्णीवाल, नाशिक येथील डॉ़ गिरीश भदर्गे, ज्योती टंडन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प्रकाश डाके, डॉ़ रिजवान काजी आदींचे मार्गदर्शन लाभले़
१५ ते २० लाख रुपयांचा खर्च
४थॅलेसेमिया आजारातून पूर्णत: मुक्तता करण्यासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट ही महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया असून, त्यासाठी १५ ते २० लाख रुपयांचा खर्च येतो़ बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी स्वॅब नमुने जुळणे आवश्यक आहे़ त्यासाठी बोनमॅरो तपासणी केली जाते़ या तपासणीसाठी साधारणत: ५० ते ६० हजार रुपयांचा खर्च येतो़ परभणीत ही तपासणी करण्यात आली असून, आता रुग्णांना पुढील उपचार करणे सोयीचे झाले आहे़
४या तपासणी शिबिरातच बोनमॅरो ट्रान्सप्लांट केंद्रांची माहिती, त्या ठिकाणी लागणारे कागदपत्रे, बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी आरोग्याची काय काळजी घ्यावी, या विषयीची माहिती शिबिरातच देण्यात आली आहे़ त्यामुळे आता रुग्णांना त्यांचा डोनर स्पष्ट झाला असून, उपचार कोठे करावयाचे याचीही माहिती प्राप्त झाल्याने या आजारातून मुक्त होण्यासाठी पुढचे पाऊल उचलता येणार आहे, असे लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी सांगितले़

Web Title: Parbhani: 33 cases of bone marrow matched patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.