परभणी : ४ गावांतील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:43 AM2019-06-27T00:43:40+5:302019-06-27T00:44:14+5:30
राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ अनुदानाच्या दुसºया टप्याची रक्कम ६ महिन्यांपासून थकली आहे. तालुक्यातील चार गावांतील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांचे दुसºया टप्याचे १ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ अनुदानाच्या दुसºया टप्याची रक्कम ६ महिन्यांपासून थकली आहे. तालुक्यातील चार गावांतील ४ हजार ३३७ शेतकऱ्यांचे दुसºया टप्याचे १ कोटी ३ लाख रुपये थकले आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत तात्काळ अनुदान देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
राज्यात दुष्काळाने होरपळलेल्या १५१ तालुक्यातील शेतकºयांना राज्य शासनाने अनुदान जाहीर केले आहे. या संदर्भात २५ जानेवारी रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला. हे अनुदान दोन टप्प्यात दिले जाणार असून बागायती पिकांसाठी ९ हजार रुपये हप्ता या प्रमाणे दोन टप्प्यात १८ हजार रुपये हेक्टरी अनुदान तर खरीप व रबी पिकांसाठी ३ हजार ४०० रुपये हप्त्याप्रमाणे ६ हजार ८०० रुपये हेक्टरी अनुदान दोन टप्यात जमा केले आहे. मानवत तालुक्याला २४ कोटी ८१ लाख २० हजार रुपये प्राप्त झाले होते. यामध्ये तालुक्यातील ५३ गावांतील शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाचा पहिला हप्ता तर ४९ गावांतील शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला. मात्र मानवत, मंगरुळ बु., वझूर बु., हमदापूर या गावांतील एकूण ४ हजार ३३७ शेतकरी दुसºया हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांचे १ कोटी ३ लाख ६५ हजार ९६४ रुपयांचे अनुदान मागील पाच महिन्यांपासून थकले आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ेलोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने प्रशासनाकडून आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले. २६ मे रोजी निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंंतर एक महिना उलटला तरी अद्यापपर्यंत अनुदान वर्ग केले नाही. मानवत शिवारातील १९०२, मंगरूळ बु. १२०४, वझूर बु. येथील ५९६, हमदापूर ६३५ असे एकूण ४ हजार ३३७ शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.