परभणी: मार्केट यार्डात ४ लाख क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:57 PM2019-03-28T23:57:44+5:302019-03-28T23:58:13+5:30

बाजार समितीच्या यार्डात कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत असून शेवटच्या टप्प्यात मालाला चांगला भाव मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. २६ मार्चपर्यंत ३ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीत झाली असून कापसाला वाढीव भाव मिळत असल्याने शेवटी पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांना तारले आहे.

Parbhani: 4 lakh quintals of cotton in the market yard | परभणी: मार्केट यार्डात ४ लाख क्विंटल कापूस खरेदी

परभणी: मार्केट यार्डात ४ लाख क्विंटल कापूस खरेदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): बाजार समितीच्या यार्डात कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत असून शेवटच्या टप्प्यात मालाला चांगला भाव मिळत असल्याने कापसाची आवक वाढली आहे. २६ मार्चपर्यंत ३ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीत झाली असून कापसाला वाढीव भाव मिळत असल्याने शेवटी पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांना तारले आहे.
शेतमालाचा उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यामुळे शेतकरी आर्थिक मेटाकुटीला येतो. त्यातच शासनाकडून दिल्या जाणाºया हमीभावाने शेतीमाल विक्री करताना शेतकऱ्यांना अटीची व निकषांची परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे अनेकदा शेतमालाच्या विक्रीतून उत्पादन खर्चही पडत नाही, अशी स्थिती असते.
यंदा कापूस पीक जगविण्यासाठी अधिक झळ शेतकºयांना बसली आहे. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे व कापूस वेचणीसाठी ८ ते १० रुपये किलो प्रमाणे पैसे माजावे लागले होते. मात्र कापूस हंगाम २०१८- १९ अंतर्गत आॅक्टोबर महिन्यात बाजार समितीच्या यार्डात लिलाव सुरु झाल्यानंतर लिलावात प्रत्यक्ष कापसाला हमीभावा पेक्षा जास्त भाव मिळाला. मधल्या काळात ५ हजार ४८० पर्यंत कापसाचे भाव खाली आले होते.
मात्र मागील आठवड्यापासून कापसाच्या भावात सतत वाढ होत असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. २६ मार्च रोजी रोजी कापूस सहा हजारी झाल्याने शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसून येत होते.
माल विक्री केल्यानंतर नगदी पैसे मिळत असल्याने परभणी, सोनपेठ, पाथरी तालुक्यांसह मानवत तालुक्यातील शेतकरी कापूस विक्रीसाठी मानवत बाजारपेठ जवळ करतात. खाजगी परवानाधारक खरेदीदारासह सीसीआयने २६ मार्चपर्यंत ३ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी केल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. बाजारपेठेतील एकूण चित्र पाहता सद्यस्थितीत कापसाचा भाव वाढत असल्याने कापूस विक्री न करता घरात राखून ठेवलेल्या शेतकºयांना कापसाने तारले आहे.
शेतकºयांची खाजगी व्यापाºयांना पसंती
शासनाचा हमीभाव ५४५० आहे. सीसीआयने आतापर्यंत १८ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. मात्र अटीची पूर्तता व कापूस विक्री केल्यानंतर पैशासाठी वाट पाहावी लागत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांना माल विक्री करुन नगदी पैसे घेण्याला पंसती देत असल्याचे दिसून येत आहे. २७ मार्च रोजी बाजार समितीच्या यार्डात झालेल्या लिलावात कापसाला ६ हजार रुपये वरचा दर मिळाला. लिलावात गिरीश कत्रुवार, विजय पोरवाल, भगवान गोलाईत, संदीप पेन्सलवार, गौरव अग्रवाल, रामनिवास टवानी, रामनिवास सारडा, जुगल काबरा, राहुल कडतन आदी खरेदीदार सहभागी झाले होते.

Web Title: Parbhani: 4 lakh quintals of cotton in the market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.