परभणी :४४८ गावांमध्ये यावर्षी देणार जमीन आरोग्य पत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:40 AM2018-01-06T00:40:14+5:302018-01-06T00:41:04+5:30
मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मृद आरोग्य अभियानांतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४४८ गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना त्यांच्या जमिनीची आरोग्यपत्रिका देण्याचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिली.
रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलीत व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मृद आरोग्य सुधारण्यासाठी आणि मूलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/ सल्फर अच्छादित युरिया सारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणाºया खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मृद आरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
२०१४-१५ ते २०१७-१८ या तीन वर्षामध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्क्यांचा आर्थिक सहभाग आहे. योजनेचे नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या अनुषंगाने माहिती देताना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर म्हणाले की, जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ४४८ गावांची मृद चाचणी व मृद आरोग्य पत्रिका वाटपासाठी निवड करण्यात आली असून या गावांमधील १ लाख ८४ हजार ३८६ शेतकºयांना या जमिनीच्या आरोग्य पत्रिका दिल्या जाणार आहेत. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील ४०० गावांची निवड करण्यात येणार असून त्यामधील १ लाख ८३ हजार ५२२ शेतकºयांना जमीन आरोग्यपत्रिका दिली जाणार आहे.
मृद आरोग्यपत्रिकेत जमिनीचे आरोग्य म्हणजेच त्यातील घटकांची मात्रा सांगितली जाणार आहे. सुपिकता पातळीनुसार रासायनिक व सेंद्रीय खतांची मात्रा किती प्रमाणात वापरावी, याचेही या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.
जमिनीत येणार सुपिकता
खरीप व रब्बी हंगामातील पिकांना शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व औषधांची मात्रा देण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीतील सुपिकतेमध्ये गेल्या काही वर्षांपासून घट होत आहे. परंतु, कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक शेतकºयांच्या जमिनीची मृद तपासणी करुन आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. या पत्रिकेत पिकांना लागणाºया रासायनिक खतांचे मोजमाप देण्यात येणार आहे. त्यामुळे अवाजवी रासायनिक खतामुळे घटत चाललेली जमिनीची सुपिकता या आरोग्य पत्रिकेमुळे वाढणार असल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे.