परभणी : शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कासाठी ५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:33 AM2019-02-28T00:33:27+5:302019-02-28T00:34:09+5:30
जिल्हा परिषद शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची फीस भरता यावी, यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्याचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत बुधवारी मंजूर करण्यात आला, अशी माहिती जि.प. उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषद शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची फीस भरता यावी, यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्याचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत बुधवारी मंजूर करण्यात आला, अशी माहिती जि.प. उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते यांनी दिली.
येथील जि.प.च्या दालनात २७ फेब्रुवारी रोजी जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीस समिती सदस्य गंगुबाई नागेश्वर, सुषमाताई देशमुख, पार्वतीताई वाघमारे, विशाखा सोळंके, प्रणिता राठोड, उमाताई वाकनकर, नारायण जाधव, राधेश्याम वाढवे, सदस्य सचिव प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांची उस्थिती होती.
या बैठकीत जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील शिष्यवृत्ती परीक्षेच्या फीससाठी ५ लाख रुपयांंची तरतूद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रती वर्ष १२ हजार रुपये याप्रमाणे बारावीपर्यंत शिक्षण घेताना चार वर्षात ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच २००६ पासून चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ न मिळालेल्या शिक्षकांना तो लाभ देण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करावी, असा ठराव घेण्यात आला.
आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकांना मिळणारी वेतनवाढीच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणाबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच राज्य व राष्टÑीय पातळीवरील क्रीडा क्षेत्रातील सहभागी खेळाडूंसाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून ५ लाख रुपये तरतुदीचाही ठराव घेण्यात आला. दहावी, बारावी परीक्षा नियोजन, गुणवत्ता, अध्ययन स्तर निश्चिती, शालेय पोषण आहार तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रलंबित प्रश्नांवर या समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती शिक्षण सभापती भावनाताई नखाते यांनी दिली.
आता तालुकास्तरावरही आदर्श शाळा पुरस्कार
४जिल्हा परिषद शाळेतील अध्ययन स्तर निश्चितीमध्ये तालुक्यातील प्रथम येणाऱ्या शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड केली जाणार आहे. त्याचबरोबर त्या शाळेला स्मार्ट टीव्ही देऊन पुरस्काराने सन्मानित केले जाणार असा ठरावही या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णया अध्ययन स्तर निश्चितीमध्ये सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
४यावर्षी परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूरांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर परिषद शाळेत शिकणाºया आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा फीस जिल्हा परिषदेच्या वतीने भरण्यात येणार असल्याने हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.
४शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या, परंतु, परिस्थितीमुळे परीक्षा फीस भरू न शकणाºया विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे.