परभणी : पालममध्ये १ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:58 PM2019-08-12T23:58:37+5:302019-08-12T23:59:54+5:30

शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या परिसरात शासनाकडून १ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पाचे साहित्य बसविण्यासाठी कार्यालय परिसरातील मैदान मोकळे केले जात असून लवकरच काम सुरू केले जाणार आहे.

Parbhani: 5 MW solar power project approved in Palam | परभणी : पालममध्ये १ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प मंजूर

परभणी : पालममध्ये १ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प मंजूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या परिसरात शासनाकडून १ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पाचे साहित्य बसविण्यासाठी कार्यालय परिसरातील मैदान मोकळे केले जात असून लवकरच काम सुरू केले जाणार आहे.
पालम शहरात पेठ पिंपळगाव रस्त्यालगत वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. या ठिकाणाहून शहरासह ग्रामीण भागातील घरगुती व कृषीपंपांना विजेचा पुरवठा सुरळीत व नियंत्रित केला जात असतो. पालम तालुक्यात विजेची मोठी मागणी असल्याने अनेकवेळा वीज भार वाढून आहे तांत्रिक बिघाडाचे प्रमाणातही वाढ झाली आहे. विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीजपुरवठ्याला मदत होईल, यासाठी शासनाकडून १ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या प्लेट व साहित्य बसविण्यासाठी कार्यालयातील परिसरात मोकळी जागा निवडण्यात आली आहे. या जागेवर सौर साहित्य बसवता यावे यासाठी जुने विद्युत खांब, विद्युत तारा, रोहित्र यासह विविध साहित्य काढून टाकले जात आहे. हा परिसर पूर्णत: मोकळा केला जात आहे. यासाठी मागील काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व कामगार काम करीत आहेत. या सौर ऊर्जा प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज बाजूच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राला जोडली जाणार आहे. त्यामुळे तुटवडा भरून काढण्यास मदत मिळणार आहे.
प्रकल्प : गती देण्याची मागणी
४पालम तालुक्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मात्र अनेकदा मागणी जास्त व पुरवठा कमी होत असल्याने तांत्रिक बिघाड होऊन वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास विजेचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.
१ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झालेला आहे. या प्रकल्पाचे साहित्य बसविण्यासाठी कार्यालयाच्या परिसरात जागा मोकळी करण्यासाठी वरिष्ठांकडून सूचना आल्या आहेत. त्याप्रमाणे यासाठीचा परिसर जुने साहित्य व तारा काढून टाकून मोकळा करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
-विवेकानंद स्वामी
उपमुख्य कार्यकारी अभियंता, पालम

Web Title: Parbhani: 5 MW solar power project approved in Palam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.