परभणी : ५८ हजार हेक्टर शेती राहणार सिंचनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:54 PM2018-11-11T23:54:04+5:302018-11-11T23:54:07+5:30

५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल्याने भयान दुष्काळाची चाहूल लागली आहे.

Parbhani: 58 thousand hectares of farming will be irrigated without irrigation | परभणी : ५८ हजार हेक्टर शेती राहणार सिंचनाविना

परभणी : ५८ हजार हेक्टर शेती राहणार सिंचनाविना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी): ५० वर्षानंतर पहिल्यांदाच येलदरी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन मिळणार नसल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या ५८ हजार हेक्टर शेत जमीन सिंचनाविनाच कोरडी राहणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्याच्या हातून खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही गेला असल्याने भयान दुष्काळाची चाहूल लागली आहे.
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे १९६८ साली पहिल्यांदा ९३४ दलघमी पाणीसाठा आडवण्यात आला होता. मागील पन्नास वर्षाच्या इतिहासात १९७२ चा अपवाद वगळता शेतकºयांना सिंचनासाठी उपयोगी ठरलेले हे धरण आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटल्यामुळे या धरणात पाणी साठवण होत नाही. यावर्षी तर परिस्थिती खूपच बिकट आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने या धरणावर अवलंबून असलेले ५८ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र यावर्षी कमी राहणार आहे. त्याच बरोबर सहा मोठे शहर, २२५ हून अधिक गावे, वाड्या व तांडे यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यात पाण्याचे नियोजन करताना येलदरी धरणात उपलब्ध असलेल्या ९ टक्के पाण्याचे नियोजन करता करता जलसंपदा विभागाच्या नाकीनऊ येणार आहेत, हे निश्चित. येलदरी धरणात उपलब्ध असलेले सर्व पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी शेती सिंचनासाठी मिळणार नसल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे अपुºया पावसामुळे ५० वर्षात पहिल्यांदाच या धरणातून शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन होणार नाही. त्यामुळे ५८ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत जमीन सिंचनाविना कोरडी राहणार आहे.

Web Title: Parbhani: 58 thousand hectares of farming will be irrigated without irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.