परभणी : खरिपाचे ५९ टक्के क्षेत्र पडिक राहण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:44 PM2019-07-08T23:44:32+5:302019-07-08T23:45:02+5:30

यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिन्याचा पहिला आठवडा ओलांडला तरीही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने सुमारे ५९ टक्के खरिपाचे क्षेत्र पेरणीअभावी पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ सध्या जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून, मोठ्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़

Parbhani: 59% area of Kharif fears to remain depressed | परभणी : खरिपाचे ५९ टक्के क्षेत्र पडिक राहण्याची भीती

परभणी : खरिपाचे ५९ टक्के क्षेत्र पडिक राहण्याची भीती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिन्याचा पहिला आठवडा ओलांडला तरीही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने सुमारे ५९ टक्के खरिपाचे क्षेत्र पेरणीअभावी पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ सध्या जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून, मोठ्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़
मागील वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी करूनही अपेक्षित उत्पादन मिळाले नव्हते़ तर रबी हंगामात पावसाअभावी पेरणीच झाली नव्हती़ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली़ खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात मोठे नुकसान सहन केल्यानंतर यावर्षीच्या खरीप हंगामातून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या़ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला़ त्यामुळे सलग दोन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाºया येथील शेतकºयांनी यावर्षीच्या हंगामातून मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत़ मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच शेतकरी खरीप पेरण्यांच्या तयारीला लागले़ शेत जमिनींची मशागत करण्यात आली़ बी-बियाणे, खतांची खरेदीही झाली आहे़ मात्र पावसाने खोडा घातल्याने जिल्हाभरात चिंतेचे वातावरण आहे़ जून महिन्यात थोडाफार पाऊस झाला असला तरी जमिनीत ओल निर्माण झाली नाही़ मृग नक्षत्रापासूनच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत़ मात्र अद्यापही मोठा पाऊस झाला नाही़
जून महिन्यामध्ये झालेल्या अल्प पावसावर काही शेतकºयांनी कापूस लागवडीचे धाडस केले आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत ४१ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी त्यात कापसाचीच सर्वाधिक लागवड आहे़ अनेक भागांत धूळ पेरण्या करण्यात आल्या़
जुलै महिन्यातील पहिला आठवडा सरला तरीही दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत़ जिल्ह्यात सद्यस्थितीला झालेल्या ४१ टक्के पेरण्या वगळता उर्वरित ५९ टक्के क्षेत्र पेरणीअभावी पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागते की काय, या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत़
१ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी
परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र खरीपाच्या पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे़ त्यापैकी १ लाख ७७ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़ उर्वरित क्षेत्रावर पेरण्या करण्यासाठी आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना लागली आहे़
४कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यामध्ये कापसाची लागवड सर्वाधिक झाली आहे़ परभणी तालुक्यात १३ हजार ९०० हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे तर गंगाखेड तालुक्यात ७ हजार ४०० हेक्टर, पाथरी १३ हजार ४०० हेक्टर, जिंतूर ३ हजार ५००, पूर्णा ४ हजार ५००, पालम ७०० हेक्टर, सेलू २५ हजार ७०० हेक्टर, सोनपेठ १० हजार ७०० हेक्टर आणि मानवत तालुक्यात १७ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़
४काही भागात बाजरी, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची पेरणी झाली आहे़ उर्वरित क्षेत्रात पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात असून, सध्याची परिस्थिती पाहता शिल्लक राहिलेले ५९ टक्के क्षेत्र पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़
जिल्ह्यात आतापर्यंत १२ टक्के पाऊस
परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४़६२ मिमी असून, सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १२़५ टक्के पाऊस झाला आहे़ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक १७़९ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ तर सोनपेठ तालुक्यामध्ये १६़९ टक्के, मानवत तालुक्यात १५ टक्के, जिंतूर ११़७ टक्के, पूर्णा १२़४, पालम १२़२ टक्के, पाथरी १०़९ टक्के, परभणी १०़६ टक्के आणि सेलू तालुक्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ७़६ टक्के पाऊस झाला आहे़ १ जूनपासून ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात ९७़१८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक १२४़५० मिमी पाऊस झाला असून, त्याखालोखाल मानवत तालुक्यात १२२़३३ मिमी पाऊस झाला आहे़ तालुक्याच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत गंगाखेड आणि सोनपेठ या दोनच तालुक्यांत चांगला पाऊस झाला असून, उर्वरित तालुक्यांत मात्र पावसाने पाठ फिरविली आहे़
१५ जुलैपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाल्यास शेतकºयांना कापूस, तूर, सोयाबीन ही पिके घेता येतील़ शेतकºयांनी कमी कालावधीचे वाण पेरणीसाठी निवडावे़ तसेच अंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा़
-यु़एऩ आळसे, कृषी विद्यावेत्ता, वनामकृवि, परभणी

Web Title: Parbhani: 59% area of Kharif fears to remain depressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.