परभणी : ५९६ बालके गंभीर कुपोषणातून बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:46 AM2018-08-20T00:46:56+5:302018-08-20T00:51:30+5:30
महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या ग्राम बालविकास केंद्र या विशेष मोहिमेमुळे १ हजार ९७ कुपोषित बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असल्याची माहिती या विभागाने दिली आहे़ विशेष म्हणजे, या मोहिमेत ४२६ बालकांना गंभीर कुपोषणातून मध्यम स्थितीत आणण्यातही विभागाला यश मिळाले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या ग्राम बालविकास केंद्र या विशेष मोहिमेमुळे १ हजार ९७ कुपोषित बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असल्याची माहिती या विभागाने दिली आहे़ विशेष म्हणजे, या मोहिमेत ४२६ बालकांना गंभीर कुपोषणातून मध्यम स्थितीत आणण्यातही विभागाला यश मिळाले आहे़
सकस आहार न मिळाल्याने बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण जिल्ह्यातही अधिक आहे़ अशा बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने मोहीम राबविली जाते़ महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वीच कुपोषण निर्मूलन उपक्रम हाती घेतला होता़ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़ पी़ पृथ्वीराज यांनी जिल्ह्यात ‘शून्य कुपोषण’ हे अभियान सुरू केले़ अभियानाच्या प्रारंभीच ग्रामीण भागात सर्वेक्षण करून कुपोषित बालकांचा शोध घेण्यात आला़ तेव्हा जिल्हाभरात १ हजार ९६ बालके कुपोषित असल्याची बाब समोर आली़ त्यानंतर या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने प्रयत्न सुरू केले़ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले़ जिल्ह्यातील २८५ केंद्रांमधून या बालकांना संतुलित आहार देण्याचे प्रयत्न सुरू झाले़
साधारणत: जुलै महिन्यात महिला व बालविकास विभागाने हे अभियान राबविले़ या अभियानाचा परिणाम दीड महिन्यातच दिसून आला़ जिल्ह्यात दाखल झालेल्या १ हजार ९७ बालकांना दररोज संतुलित आहार देणे, त्यांचे वजन घेणे, आरोग्य तपासणी करणे असे उपक्रम राबविण्यात आले़ त्यात जिल्हाभरातील विविध केंद्रांत दाखल झालेल्या बालकांपैकी ५९६ बालके गंभीर कुपोषणातून कायमची बाहेर पडली असून, ४२६ बालके मध्यमस्थितीत आली आहेत़ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ कैलास घोडके यांनी सुक्ष्म नियोजन केले़ महिला व बालकल्याण सभापती राधाबाई सूर्यवंशी यांनी वेळोवेळी केंद्रांना भेटी देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश दिले़ त्यामुळेच कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी मदत झाली, असे डॉ़ घोडके यांनी सांगितले़
घरोघरी ठेवा बाळ कोपरा
बालकांमध्ये मुळातच खाण्याची आवड असते़ त्यांना थोड्या थोड्या वेळाने काही तरी खायला लागते. तेव्हा प्रत्येक पालकांनी आपल्या घरात मुरमुरे, शेंगदाणे लाडू, खजूर, गुळपट्टी असे पदार्थ भरणीमध्ये भरून ठेवावीत़ हे पदार्थ मुलांना सहज हाताला येतील, अशा पद्धतीने ठेवावीत, असे आवाहन जि.प. तर्फे करण्यात आले आहे.
२८५ केंद्रांतून बालकांची देखभाल
कुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात २८५ ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले़ त्यात गंगाखेड तालुक्यात १७, पाथरी ४१, परभणी २९, जिंतूर ६१, पालम ३१, पूर्णा २७, सेलू ३८, मानवत २९ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १२ केंद्र सुरू करण्यात आले़ या अंगणवाडी केंद्रात दाखल झालेल्या बालकांना जुलै महिन्यापासून दररोज सात वेळा नियमितपणे अमायलेज युक्त आहार देण्यात आला़ तसेच गरजेनुसार औषधी देण्यात आली़ यासाठी सेविकांना प्रती बालक प्रती दिवस २५ रुपये या प्रमाणे निधीही उपलब्ध करून दिला़ वैद्यकीय अधिकाºयांमार्फत १५ दिवसांना बालकांची तपासणी करण्यात आली़