परभणी : ६४ हजार पुस्तके दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:24 AM2018-05-25T00:24:35+5:302018-05-25T00:24:35+5:30
तालुक्यातील १३ हजार ६७३ विद्यार्थ्यांसाठी ६४ हजार पाठ्यपुस्तके दाखल झाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी या पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : तालुक्यातील १३ हजार ६७३ विद्यार्थ्यांसाठी ६४ हजार पाठ्यपुस्तके दाखल झाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी या पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्यात येणार आहेत. मानवत तालुक्यात मराठी माध्यमातील १२ हजार ४९५ तर उर्दू माध्यमाचे १ हजार १७८ असे एकूण १३ हजार ६७३ विद्यार्थ्यांची संख्या आहे. या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके मिळावेत, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने औरंगाबाद येथील बालभारती पाठ्यपुस्तक महामंडळाकडे पुुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मानवत तालुक्यासाठी ६४ हजार ११३ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २३ मे रोजी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या सभागृहात ही पुस्तके उतरविण्यात आली आहेत. केंद्रप्रमुखांच्या मागणीनुसार पंधरवाडयात मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यावर्र्षी आत्ताच पुस्तके उपलब्ध झाल्याने शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करणे सोपे जाणार असल्याची माहिती विभागप्रमुख गुंजे यांनी दिली.