परभणी : ६५ गावांच्या सिंचन प्रश्नी लक्ष घालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:43 AM2019-01-15T00:43:52+5:302019-01-15T00:44:10+5:30

चार तालुक्यांतील माथ्यावरील ६५ गावांच्या सिंचन प्रश्नाकडे लक्ष घालण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिले.

Parbhani: 65 villages will get irrigation questions | परभणी : ६५ गावांच्या सिंचन प्रश्नी लक्ष घालणार

परभणी : ६५ गावांच्या सिंचन प्रश्नी लक्ष घालणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : चार तालुक्यांतील माथ्यावरील ६५ गावांच्या सिंचन प्रश्नाकडे लक्ष घालण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिले.
राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाºया विविध योजना गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहचल्यात की नाहीत, या संदर्भातील माहिती घेण्यासाठी तसेच सुधारणा आणि अडचणींसंदर्भात शेतकºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचा ‘लोकसंवाद’ हा कार्यक्रम सोमवारी सकाळी ११़४० च्या सुमारास आयोजित करण्यात आला होता़ त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षामध्ये जिल्ह्यातील १५ शेतकºयांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला़ यावेळी पेडगाव येथील शेतकरी मंगेश प्रताप देशमुख यांनी बोलताना आपल्याकडे साडेचार एकर शेती असून, त्यापैकी अडीच एकरमध्ये फळबाग फुलविली आहे़ पावणे दोन एकरात फूल शेती करीत आहे़ यासाठी कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ झाल्याचे सांगितले़ गावाच्या दोन्ही बाजूंनी लोअर दुधना आणि जायकवाडी धरणाचे कालवे आहेत़ मात्र दोन्ही कालव्यांच्यामध्ये असलेल्या ६५ गावांच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे़ या प्रश्नी आपण पुढाकार घेऊन तो सोडवावा, असे साकडे देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना घातले़ त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासन सिंचनाच्या सुविधा शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजना यशस्वीरीत्या राबवित आहे़ शेतकºयांना त्याचा फायदाही होत आहे़ ६५ गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच राज्य सरकार लक्ष घालेल, असे सांगितले़ त्यामुळे भविष्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली लागण्याच्या दृष्टीकोनातून हालचाली होण्याच्या अपेक्षा परभणी, मानवत, सेलू व जिंतूर तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थांना लागल्या आहेत़
यावेळी गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील शेतकरी शेषराव सोपानराव निरस यांनी २०१७ मध्ये खरीप हंगामात झालेल्या नुकसानीतील २० हजार रुपये हेक्टर प्रमाणे ४० हजार रुपये मिळाल्याचे सांगितले़ या पैशाचा रबीच्या निविष्टा खरेदीसाठी फायदा झाल्याचे ते म्हणाले़ पीक विमा योजनेत क्षेत्र सुधार गुणांक व जोखीम स्तराच्या सुधारणेबद्दलही यावेळी त्यांनी सूचना केल्या़ जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील शेतकरी शिवाजी सानप यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामाने पाणी पातळीत वाढ झाल्याचे सांगितले़ आता गावात सध्या १२ एकरवर द्राक्षाची लागवड करण्यात आली असल्याचे सांगून त्यांनी शेतकरी शेततळे घेऊ इच्छितात़ मात्र अनुदान अपुरे पडते आणि पन्नीसाठी अनुदान मिळत नसल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली़ शेवडी येथील शेतकरी खुशाल काळे यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा लाभ मिळाल्यामुळे ६ एकरात द्राक्ष बाग फुलविल्याचे सांगितले़ शेतात घेतलेल्या शेततळ्याचा फायदाही त्यांनी यावेळी सांगितला़ यावर मुख्यमंत्र्यांनी शेततळ्याच्या सबसिडीसाठी कोणाला पैसे दिले का, असा प्रतिप्रश्न करताच काळे यांनी कोणालाही पैसे दिले नसल्याचे सांगितले़ दैठणा येथील शेतकरी भरत कच्छवे यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेतून सव्वा लाख रुपये अनुदानातून ट्रॅक्टर मिळाल्याचे सांगितले़ थेट रक्कम मिळत असल्याने शेतकरी मनाप्रमाणे ट्रॅक्टर किंवा कृषी आवजारे घेऊ शकत आहेत़ याचा शेतकºयांना फायदा झाल्याचे ते म्हणाले़ इंद्रायणी काठावर बंधारे बांधल्यास या भागातील पाण्याचा प्रश्न सुटेल असे ते म्हणाले़ धानोरा काळे येथील शेतकरी प्रताप काळे यांनी वगार पालनासाठी बँकेकडून कर्ज मिळण्यास अडचण येत असल्याचे सांगितले़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालण्यात येईल, असे सांगितले़ खानापूर येथील शेतकरी पंडित थोरात यांनी संत शिरोमणी सावता माळी शेतकरी बाजारामुळे पहिल्याच दिवशी कृषी मालाला चांगला भाव मिळाल्याचे सांगितले़ शेतकरी बाजारात आपण दोन-तीन प्रकारचे वांगे विक्रीसाठी आणले होते़ या वांग्याला १० रुपयांऐवजी प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळाल्याचे ते म्हणाले़ यावेळी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, शेतकरी बालाजी मोहिते आदींची उपस्थिती होती़
शासन एक लाख सौरपंप देणार
४यावेळी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील शेतकरी मोहन सिताराम कापसे यांनी २० शेतकºयांचा गट स्थापन करून आम्ही पॉली हाऊस सुरू केले असल्याचे सांगितले़ यासाठी कृषी विभागाने अनुदान दिले असून, डच फुलाचे उत्पादन या गटामार्फत मोठ्या प्रमाणात घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले़ भारनियमाच्या समस्येमुळे आम्ही शेतकरी त्रस्त असल्याचे ते म्हणाले़ यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात १ लाख सौरपंप देण्याची योजना राबविणार असून, सर्व फिडर हे सौर उर्जेवर चालविण्यात येणार आहेत़ हे काम सुरु झाले आहे़ काही वर्षांत ते पूर्ण होईल, तेव्हा २४ तास वीज उपलब्ध होईल, असे ते म्हणाले़
सिमला मिरचीतून मिळाले उत्पादन
या लोकसंवाद कार्यक्रमात पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील महिला शेतकरी जयमाला अशोकराव शिंदे याही उपस्थित होत्या़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना तार्इंना बोलू द्या, असे सांगितल्यानंतर शिंदे यांनी आपण आधुनिक पद्धतीने शेती करीत असल्याचे सांगून १६ लाख रुपये किंमतीचे शेतात पॉलीहाऊस घेतल्याचे त्या म्हणाल्या़ सिमला मिरचीच्या उत्पादनातून यावर्षी चांगले वार्षिक उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले़

Web Title: Parbhani: 65 villages will get irrigation questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.