परभणी : मसला येथे ८ जणांना गॅस्ट्रोची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:35 AM2018-04-30T00:35:56+5:302018-04-30T00:35:56+5:30
तालुक्यातील मसला येथे आठ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ यातील दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना परभणी येथे हलविण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मसला येथे आठ जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने त्यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ यातील दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना परभणी येथे हलविण्यात आले़
मसला येथील गयाबाई भानुदास शिंदे (७०), शिवकृपा गोपाळ शिंदे (२२), राधाबाई सूर्यकांत शिंदे (२५), ज्ञानेश्वरी गोपाळ शिंदे (२०), मुंजाजी माधवराव शिंदे (२०) यांना २९ एप्रिल रोजी दुपारपासून उलटी व जुलाब होत होते़
या सर्व रुग्णांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वाती मुंडे, डॉ़ देविदास चव्हाण, परिचारिका सुनंदा हटकर, संगीता लटपटे यांनी प्रथमोपचार केले़
या रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली़ गयाबाई शिंदे व मुंजाजी शिंदे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ तसेच राजाभाऊ भानुदास शिंदे (२०), अरुणाबाई ज्ञानेश्वर शिंदे (२५) व जोगदंड यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ मसला गावात गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समजल्यानंतर महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ पी़ आऱ चट्टे यांचे पथक रात्री ८ वाजेच्या सुमारास मसला गावाकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली.