परभणी :९८८ शेतकऱ्यांचे उंचावले मनोबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:11 AM2018-07-23T00:11:31+5:302018-07-23T00:12:31+5:30
राज्य शासनाच्या प्रेरणा प्रकल्प व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिकदृष्ट्या खचलेल्या तब्बल ९८८ शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी केले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना एक प्रकारे मानसिक आधार मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्य शासनाच्या प्रेरणा प्रकल्प व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिकदृष्ट्या खचलेल्या तब्बल ९८८ शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाºयांनी केले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना एक प्रकारे मानसिक आधार मिळाला आहे.
मागील काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शेतात पिकत नसल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले होते. राज्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने शेतकºयांचे मनोबल उंचावणे आणि त्यांना धीर देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये प्रेरणा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून या जिल्ह्यात ग्रामस्तरावर शेतकºयांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
परभणी जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविला जात असून, त्याअंतर्गत वर्षभरातून दोन वेळा सर्वेक्षण केले जाते. त्यात ७ हजार ८३४ शेतकºयांपर्यंत आरोग्य विभागाचे कर्मचारी पोहोचले. या शेतकºयांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करुन त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यात ९८८ शेतकरी तीव्र प्रकारात आणि १८३५ शेतकरी मध्यम प्रकारात मोडत असल्याचा अहवाल या प्रकल्पाने काढला.
एकंदर हे शेतकरी आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत होते. त्यामुळे तीव्र आणि मध्यम प्रकारात मोडणाºया शेतकºयांचे प्रबोधन करण्यात आले. त्यांना आरोग्याच्या सर्व सुविधा मोफत पुरविण्यात आल्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे या शेतकºयांचे मनोबल उंचावले आहे. या प्रकल्पामुळे तब्बल ९८८ शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
दररोज होतो पाठपुरावा
प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात ९८८ शेतकरी अतितीव्र प्रकारच्या मन:स्थितीत असल्याचे आढळले. या शेतकºयांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षातील अधिकारी, कर्मचारी दररोज शेतकºयांचा पाठपुरावा करीत असत. त्यांना काय लागते, त्यांची मन:स्थिती कशी आहे, याबरोबरच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात असते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधूनच अतितीव्र गटातील ९८८ आणि मध्यम गटातील १८३५ शेतकºयांचे मनोबल सध्या उंचावले असून, हे शेतकरी परिस्थितीशी सामना करण्यासाठी सक्षम झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून दिली. या कामी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथर, मनोविकार तज्ज्ञ डॉ.तारेक अन्सारी, अमरदीप घाडगे, प्रशांत पतंगे, महादेव जाधव, भास्कर काऊतकर आदींनी प्रयत्न केले.
आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण
या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील आशा सेविकांमार्फत शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच या आशा सेविकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षणही देण्यात आले. शेतकरी कोणत्या कारणांमुळे नैराश्यात गेला, याचा शोधही या सेविकांमार्फत घेतला जातो. त्यानंतर मानसिक जिल्हा आरोग्य कार्यक्रमांतर्गत कौटुंबिक समुपदेशन, वर्तणूक उपचार, मानसोपचार व औषधोपचार या माध्यमातून शेतकºयांना मदत केली जाते.