परभणी : कालव्यातील ९० टक्के पाण्याची होतेय नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:58 PM2018-11-11T23:58:19+5:302018-11-11T23:58:44+5:30
जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यातून पंधरा दिवसांपूर्वी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्यावरील पुलाची दुरुस्तीच करण्यात आली नसल्याने ९० टक्के पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे २४ कि.मी. लांबीच्या कालव्यापैकी पंधरा दिवसानंतर केवळ १० कि.मी. पर्यंतच पाणी पोहचले असून, शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यातून पंधरा दिवसांपूर्वी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्यावरील पुलाची दुरुस्तीच करण्यात आली नसल्याने ९० टक्के पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे २४ कि.मी. लांबीच्या कालव्यापैकी पंधरा दिवसानंतर केवळ १० कि.मी. पर्यंतच पाणी पोहचले असून, शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बोरीसह परिसरातील शेतकºयांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. या शेतकºयांना दिलासा मिळावा, यासाठी काही वर्षापूूर्वी जिंतूर तालुक्यातील निवळी येथे करपरा धरण उभारण्यात आले. या धरणातील पाण्यावर २४ कि.मी. अंतरावरील शेतकºयांना सिंचनाची सुविधा होऊ शकते. त्यामुळे बोरी, निवळी व परिसरातील शेतकºयांना हे धरण एक वरदान ठरले.
यावर्षी जूनपासूनच समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, मूग व उडीद ही पिके शेतकºयांच्या हातून गेली. लागवडीवर केलेला खर्चही शेतकºयांच्या पदरात पडला नाही. त्यामुळे रबी हंगामातील पिके घेण्यासाठी करपरा धरणात मूबलक पाणीसाठा असल्याचे शेतकºयांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकºयांनी रबी हंगामातील पेरणीची लगबग सुरू केली. शेतकरी, राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन केलेल्या पाठपुराव्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी निवळी येथील करपरा धरणाच्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. या कालव्यावर चार ठिकाणी पूलही उभारण्यात आले आहेत. पाणी सोडण्याआधी पाटबंधारे विभागाकडून या पुलांची व कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते; परंतु, तसे केले नाही.
पंधरा दिवसांपासून सोडण्यात आलेले पाणी केवळ दहा कि.मी. अंतरापर्यंतच पोहचले आहे. त्यामुळे अजूनही १४ कि.मी. अंतरावरील शेतकºयांना पाणीच मिळाले नाही. विशेष म्हणजे, पाटबंधारे विभागाकडून या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने सोडण्यात आलेल्या पाण्यापैकी तब्बल ९० टक्के पाणी वाया जात आहे. त्यामुळे रबी हंगामातील पेरणीसाठी करपरा धरणातील पाणी मिळेल, या आशेवर बसलेल्या शेतकºयांच्या पदरी सध्या तरी निराशा आली आहे.
पाटबंधारे विभागातील अधिकाºयांनी सोडण्यात आलेले पाणी तत्काळ बंद करून कालव्याची व कालव्यावरील पुलांची दुरुस्ती करून पुन्हा पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.
तक्रारी करूनही : होईना उपयोग
४जिंतूर तालुक्यातील निवळी येथे करपरा धरण आहे; परंतु, या धरणाचे कार्यालय बोरी येथे आहे. या कार्यालयाकडे कालव्याच्या दुरुस्ती संदर्भात वेळोवेळी तक्रारी करूनही अद्यापपर्यंत कोणताच उपयोग झाला नाही. विशेष म्हणजे, हे कार्यालय नेहमीच बंद असते. शाखा अभियंता नेहमीच गैरहजर राहत असल्याने कार्यालयातील कर्मचाºयांवर अंकूश राहिलेला नाही.
४त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन कालव्याची व पुलाची दुरुस्ती न करताच पाणी सोडणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कार्यवाही करावी, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांमधून केली जात आहे.
दरम्यान, शाखा अभियंता दत्तराव पतंगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कालव्यावरील पाण्याची चार ठिकाणाहून नासाडी होत असल्याचे सांगितले. तेव्हा पतंगे यांनी पाण्याचा झिरपा नेहमीच सुरू राहतो, यासाठी कोणत्याही उपाययोजना करता येत नाही, असे त्यांनी सांगितले.