परभणी : डिजिटल सातबाराचे ९६ टक्के काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 11:47 PM2019-06-29T23:47:35+5:302019-06-29T23:48:04+5:30

शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा कोणत्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध झालीच पाहिजे, त्या अनुषंगाने तालुक्यात डिजीटल स्वाक्षरीच्या संगणकीकृत सातबारासाठी डाटा अपलोडची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.

Parbhani: 96 percent of Digital Satara's work | परभणी : डिजिटल सातबाराचे ९६ टक्के काम

परभणी : डिजिटल सातबाराचे ९६ टक्के काम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा कोणत्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध झालीच पाहिजे, त्या अनुषंगाने तालुक्यात डिजीटल स्वाक्षरीच्या संगणकीकृत सातबारासाठी डाटा अपलोडची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.
तालुक्यात १४०९३ सातबारांची संख्या असून त्यापैकी १३ हजार ५४२ सातबारा आॅनलाईन झाल्या आहेत. उर्वरित ५५१ सातबारा आॅनलाईन करण्याच्या सूचना तलाठ्यांना देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील संपूर्ण सातबारा डिजिटल स्वाक्षरीने संगणकीकृत होणार आहेत. कोणत्याही शेतकºयास आपली सातबारा आॅनलाईन पाहता येणार आहे. तसेच त्या सातबाराची प्रिंटही काढता येणार आहे. त्यामुळे तलाठ्यांकडे किंवा तहसीलमध्ये जाण्याचा वेळ वाचणार आहे.
यापूर्वी केवळ सातबारासाठी शेतकऱ्यांना विविध कामे सोडून तहसील कार्यालय व तलाठ्याकडे चकरा माराव्या लागत होत्या. आता ही गैरसोय डिजिटल सातबारामुळे दूर होणार आहे. शेतकºयांना लवकरच तालुक्यात कोठेही डिजिटल सातबारा उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, तहसील प्रशासनाकडून डिजिटल सातबारा तयार करण्याचे काम ९६ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित ४ टक्के काम पूर्ण करण्यासाठी महसूल प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
तांत्रिक अडचणींचा करावा लागणार सामना
शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांना संगणकीकृत सातबारा मिळाव्यात, यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. सोनपेठ तालुका प्रशासनानेही शासनाच्या आदेशाचे पालन करीत व तालुक्यातील शेतकºयांना डिजिटल साताबारा मिळाव्यात यासाठी दिवस-रात्र काम करून संगणकीय सातबारा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट चालत नाही. त्यामुळे आॅनलाईन सेवा ठप्प होते. अशा वेळी सातबारा मिळविण्यासाठी शेतकºयांना तालुक्याच्या ठिकाणीच यावे लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Parbhani: 96 percent of Digital Satara's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.