परभणी : फरार ग्रामसेवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:39 AM2018-10-03T00:39:37+5:302018-10-03T00:40:01+5:30
दीड वर्षापूर्वी तालुक्यातील नरळद येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून फरार असलेल्या ग्रामसेवकास २ आॅक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): दीड वर्षापूर्वी तालुक्यातील नरळद येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून फरार असलेल्या ग्रामसेवकास २ आॅक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिंचन विहिरीच्या कुशल कामाच्या देयकाच्या ८ लाख ५७ हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी दीड वर्षापूर्वी गंगाखेड पोलीस ठाण्यात तात्कालीन सरपंच बालासाहेब कदम व ग्रामसेवक गणेश गायकवाड यांच्याविरुद्ध गंगाखेडचे पं.स.चे विस्तार अधिकारी पी.एम . सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सरपंच बालासाहेब कदम यांचा मृत्यू झाला. तर ग्रामसेवक गायकवाड हे फरार होते. त्यास मंगळवारी अटक करण्यात आली आहे.